सावली येथे वंचित बहुजन आघाडी च्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन.
एस.के.24 तास
सावली : दिनाक,८/०४/२०२४ ला सावली येथे वंचित बहुजन आघाडी चे गडचिरोली - चिमूर लोकसभा चे अधिकृत उमेदवार, प्रा. हितेश पांडुरंग मडावी यांच्या प्रचार कार्यालयाचे उद्घाटन करण्यात आले.
सदर कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून उमेदवार हितेश मडावी प्रामुख्याने उपस्थित होते. कार्यक्रमात बोलताना ते म्हणाले "जर हा महाराष्ट्र पुन्हा महामानवाच्या विचारांचा बनवायचा असेल तर आपल्याला श्रधेय बाळासाहेब आंबेडकर यांच्या शिवाय पर्याय नाही.आपल्यातला एक वंचित घटकातील उमेदवार संसदेत पाठवल्यास आपल्या प्रश्नांना दिल्लीत वाचा फोडल्याशिवाय शांत बसणार नाही.
उद्घाटन सोहळ्यास वंचित बहुजन आघाडी चे जिल्हा उपाध्यक्ष विलास माहोरकर , तालुकाध्यक्ष भास्कर आभारे, जिल्हा उपाध्यक्ष महिला आघाडी उल्का गेडाम, शहराध्यक्ष रोशन बोरकर, युवा आघाडी जिल्हा उपाध्यक्ष अनिकेत गोडबोले, पाटील सर, कल्यानम रामटेके, ए. आर. दुधे, वीणा गडकरी, राणी मोटघरे, ललिता मेश्राम, कांतीलाल बोरकर,विलास बोरकर, आनंदराव रंगारी, ललिता मेश्राम, रीना दुधे, सविता सेमस्कर, यशोधरा डोहने, संजय घडसे,श्रेयस मेश्राम, वैभव गोडबोले , चंदा बोरकर आणि अनेक पदाधिकारी यांच्या सह कार्यकर्ते उपस्थित होते.