संशोधनकर्त्याने संशोधनाची मार्गदर्शक तत्वे लक्षात घ्यावी. - पदव्युत्तर विभागात कार्यक्रम. डॉ.जगदिश मेश्राम
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : १८/०४/२४ " संशोधन हे कधी न संपणारे शास्त्र आहे.समाजात आधिच जे आहे,त्यातले आपल्याला शोधून काढणे आहे.संशोधनाची दिशा कळली पाहिजे.संशोधनकर्त्याने संशोधनाची मार्गदर्शक तत्वे लक्षात घेणे गरजेचे आहे " असे विचार डॉ बाबासाहेब आंबेडकर महाविद्यालयांतील मराठी विभागप्रमुख डॉ.जगदिश मेश्रामांनी व्यक्त केले.ते नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयात पदव्युत्तर मराठी विभागात विद्यार्थ्यांची मौखिक परिक्षा घेतांना बोलत होते.
अध्यक्षस्थानी मराठी विभागप्रमुख कवी डॉ धनराज खानोरकर होते तर उपस्थितीत डॉ पद्माकर वानखडे,प्रा प्रशांत राऊत,प्रा गणेश सांगळरकर उपस्थित होते.यावेळी अध्यक्षीय मनोगतात डॉ खानोरकर म्हणाले की, विद्यार्थी संशोधन करतांना त्या विषयाशी एकरुप व्हायला हवा.घेतलेला विषय अभ्यासपूर्ण आणि संशोधन करुन त्याने मांडावा.पध्दती वापरतांना आणि निष्कर्ष मांडतांना ती तर्कसंगत हवी.असे विचार व्यक्त केले.
प्रास्ताविक, सूत्रसंचालन व आभार डॉ.पद्माकर वानखडेंनी केले.यावेळी मराठी विभागाचे अनेक विद्यार्थी उपस्थित होते