मौशीखांब येथे डॉ.आंबेडकर जयंती व मिरवणुक.
एस.के.24 तास
गडचिरोली : गडचिरोली तालुक्यातील मौशीखांब येथे बौद्ध बांधवानी डॉ. बाबासाहेब आंबेडकरांची जयंती साजरी करून गावातुन मिरवणुक काढण्यात आली. रिपाईचे जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर यांनी डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या प्रतिमेला हार अर्पण केले.
तर सरपंच्या पेंदाम मॅडम तुम्ही काय यांनी म. ज्यांतीबा फुले यांच्या प्रतिमेला माल्यार्पण केले . याप्रसंगी प्रा.मुनिश्वर बोरकर,सरपंच रॅजिता पेंदाम मॅडम,उपसरपंच रुपाली गांधलवार,मारोती भैसारे , जगदिश ठाकरे,लोभाजी हर्षे,पाडुरंग समर्थ संतोष उंदिरवाडे,मोनेश उंदिरवाडे आदि लाभले होते.
याप्रसंगी बोरकर सर म्हणाले की.आंबेडकरी जनतेच २०% राजकारण व ८०% समाजकारण आहे. आपण योग्य उमेदवार निवडावा.संविधान आज केंद्रस्थानी आहे.भिती बाळगु नका असेही सांगीतले. कार्यक्रमाचे संचलन मोरेश्वर उंदिरवाडे यांनी केले.
कार्यक्रमास मुखरु उंदिरवाडे , ग्रा.प. सदस्य विकास उंदिरवाडे , ग्रा.प. सदस्या निर्मला आलाम , महिला मंडळाच्या अध्यक्षा प्रेमिला भैसारे , संतोष उंदिरवाडे , दिवाकर चिलबुले , हंसराज कांबळे , ढिसु ढवळे , प्रतिभा ढवळे , माया जनबंधु , उज्वला उंदिरवाडे . दिपक उंदिरवाडे , फुलाबाई उंदिरवाडे आदि सहीत बहुसंख्य उपाषक वं उपाषि का बहुसंख्येनी उपस्थित होते .