उर्जानगरात बाल सूसंस्कार जीवन शिक्षण शिबिराचे उदघाटन ; श्रीगुरुदेव सेवा मंडळ ऊर्जानगरचा उपक्रम.
एस.के.24 तास
चंद्रपूर : महाऔष्णिक विज केंद्राच्या ऊर्जानगर वसाहतीत श्रीगुरुदेव सेवा मंडळच्या वतीने आयोजित दि.२५ एप्रिल ते ०४ मे २०२४ दहा दिवसीय बाल सूसंस्कार व जीवन शिक्षण शिबिराचे उदघाटन ग्रामगीताचार्य बंडोपंत बोढेकर यांचे हस्ते करण्यात आहे. अध्यक्षस्थानी भूवैकुंठ अड्याळ टेकडी चे संचालक सुबोधदादा होते.
तर प्रमुख अतिथी भूवैकुंठ अड्याळ टेकडी च्या कार्याध्यक्ष रेखाताई बुराडे , श्री गुरुदेव सेवा मंडळाचे अध्यक्ष प्रशांत दुर्गे, मुरलीधर गोहणे अध्यक्ष तुकारामदादा गीताचार्य प्रतिष्ठान नागपूर,पांडुरंग पिसे श्री गुरुदेव सेवा मंडळ छत्रपती नगर याची प्रामुख्याने उपस्थिती होती.
या कार्यक्रमाची सुरुवात श्री गुरुदेवाच्या अधिष्ठानाला माल्यार्पण व दीपप्रज्वलन करून करण्यात आली. प्रास्तविकपर मनोगत मुरलीधर गोहणे यांनी केले .बाल वयात केलेल्या उत्तम संस्काराने जीवन आदर्शवत बनते असे प्रतिपादन रेखाताई बुराडे यांनी व्यक्त करून शिबिरार्त्यांना दहा दिवस चालणाऱ्या शिबिराची सविस्तर माहिती दिली .पांडुरंग पिसे यांनी यांनी सर्व शिबिरार्थ्यांना शुभेच्छा दिल्यात.
ग्रामगीतेच्या विचारानुसार ग्रामरचनेचे व जीवन विकासाचे शिक्षण देणारी सुसंस्कार शिबिरे गावागावात व्हायला हवीत जेणेकरून कर्तव्यनिष्ठ नागरिक तयार होतील,असे प्रतिपादन बंडोपंत बोढेकर यांनी केले.
तसेच सुसंस्कार शिबिरे ही सात्त्विक संपत्तीचे आगर असून त्यातून आपली उत्तम ग्राम संस्कृती टिकविण्यासाठी चालना मिळत असते असे कार्यक्रमाचे अध्यक्ष सुबोधदादा यांनी प्रतिपादन केले.या कार्यक्रमाचे सूत्रसंचालन नानाजी बावणे यांनी केले तर आभार रुपाली चहानकर यांनी मानले.