लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर - रामटेक,भंडारा - गोंदिया, गडचिरोली - चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज,शुक्रवारी मतदान होत आहे.
★ नक्षलग्रस्त संवेदनशील भागांत चोख सुरक्षा व्यवस्था ; विदर्भात ५ जागांसाठी आज मतदान.
एस.के.24 तास
नागपूर : निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील नागपूर, रामटेक, भंडारा-गोंदिया, गडचिरोली-चिमूर आणि चंद्रपूर या पाच मतदारसंघात आज, शुक्रवारी मतदान होत आहे.
नागपूरमध्ये भाजपचे नितीन गडकरी आणि काँग्रेसचे विकास ठाकरे,रामटेकमध्ये शिवसेनेचे,राजू पारवे आणि काँग्रेसचे श्यामकुमार बर्वे,गडचिरोलीत भाजपचे,अशोक नेते आणि काँग्रेसचे डॉ.नामदेव किरसान,चंद्रपूर मध्ये भाजपचे सुधीर मुनगंटीवार आणि काँग्रेसच्या प्रतिभा धानोरकर तर भंडारा - गोंदिया भाजपचे सुनील मेंढे आणि काँग्रेसचे प्रशांत पडोळे यांच्यात लढत आहे.
नक्षलग्रस्त भागात ३ वाजे पर्यंतच मतदान -
मतदानाची वेळ सकाळी ७ ते सायंकाळी ६ अशी आहे. मात्र, गडचिरोली-चिमूर मतदारसंघातील आमगाव, आरमोरी,गडचिरोली आणि अहेरी ही चार विधानसभा क्षेत्रे नक्षलग्रस्त आहेत.त्यामुळे सुरक्षेच्या दृष्टीने तेथे सकाळी ७ वाजता मतदान सुरू होईल आणि दुपारी ३ वाजता संपेल. ब्रह्मपुरी आणि चिमूर या दोन विधानसभा क्षेत्रांत मात्र सायंकाळी ६ पर्यंत मतदान होईल.
मतदारांसाठी सुविधा
* १०२ मतदार केंद्रांमध्ये १४. १४ लाखांहून अधिक नोंदणीकृत ८५ वर्षांहून अधिक वयोगटातील मतदार आहेत तसेच, १३.८९ लाख अपंग मतदार असून त्यांना त्यांच्या घरी मतदान करण्याचा पर्याय उपलब्ध करून देण्यात आला आहे.
* या मतदारांनी मतदान केंद्रांवर येण्याचा निर्णय घेतला तर त्यांच्यासाठी वाहतुकीची व्यवस्था करण्यात आली आहे. मतदानयंत्रांवर ब्रेल चिन्हेही असतील. स्वयंसेवक सर्व सुविधा पुरवल्या जातील. अपंग मतदारांनी ECI Saksham अॅपद्वारे व्हीलचेअर सुविधेसाठी नोंदणी करता येईल.
* वृद्ध आणि अपंग व्यक्तींसह प्रत्येक मतदार सुलभतेने मतदान करू शकतील. त्यासाठी पाणी, आडोसा, शौचालय, रॅम्प, स्वयंसेवक, व्हीलचेअर आणि वीज यांसारख्या किमान सुविधा उपलब्ध आहेत.
* ५ हजारांहून अधिक मतदान केंद्रांचे व्यवस्थापन अगदी सुरक्षा कर्मचाऱ्यांसह महिलांद्वारे केले जाईल. १ हजारहून अधिक मतदान केंद्रांचे अपंग व्यक्ती व्यवस्थापन करतील.
* सर्व नोंदणीकृत मतदारांना मतदार माहितीपत्रिका (स्लिप) देण्यात आल्या आहेत. त्याचा मतदान केंद्रावर मतदानासाठी उपयुक्त ठरतील. https://electoralsearch.eci.gov.in/ या लिंकद्वारे मतदार त्यांचे मतदान केंद्र तपशील आणि मतदानाच्या तारखेची शहानिशा करता येऊ शकेल.
कडेकोट सुरक्षा बंदोबस्त
* निवडणूक शांततेत आणि सुरळीत पार पाडण्यासाठी मतदान केंद्रांवर केंद्रीय दले पुरेशा प्रमाणात तैनात केली आहेत.
* सर्व मतदान केंद्रांवर निरीक्षकांच्या तैनातीसह ५० टक्क्यांपेक्षा जास्त मतदान केंद्रांवर वेबकािस्टग केले जाईल.
* ३६१ निरीक्षक (१२७ सर्वसामान्य निरीक्षक, ६७ पोलीस निरीक्षक, १६७ अर्थविषयक निरीक्षक) मतदानाच्या काही दिवस आधीच त्यांच्या मतदारसंघात पोहोचले आहेत. हे निरीक्षक मतदानाच्या प्रक्रियेवर करडी नजर ठेवतील. याशिवाय काही राज्यांमध्ये विशेष निरीक्षकही तैनात केले आहेत.
★ एकूण ४ हजार ६२७६ फ्लाइंग स्क्वॉड्स, ५ हजार २०८ स्टॅटिस्टिक्स सव्र्हिलन्स टीम्स, २ हजार २८ व्हिडिओ सव्र्हिलन्स टीम्स व १ हजार २५५ व्हिडिओ व्ह्यूइंग टीम्स २४ तास पाळत ठेवतील. या दक्षतेमुळे कणत्याही प्रकारच्या प्रलोभनांना आळा घातला जाईल.
◆ एकूण १ हजार ३७४ आंतरराज्यीय व १६२ आंतरराष्ट्रीय सीमा तपासणी नाके दारू, ड्रग्ज, रोख रक्कम आणि मोफत वस्तूंच्या कोणत्याही अवैध देवाण-घेवाणीवर, वाहतुकीवर कडक नजर ठेवतील. सागरी आणि हवाई मार्गावर पाळत ठेवण्यात आली आहे.
१९ राज्यांमध्ये १०२ मतदारसंघांत जय्यत तयारी : -
★ पहिल्या टप्प्यात देशभरात १०२ मतदारसंघांपैकी ७३ खुल्या गटातील तर अनुसूचित जातींसाठी ११ व अनुसूचित जमातींसाठी १८ मतदारसंघ राखीव आहेत.
◆ अरुणाचल आणि सिक्कीममधील ९२ विधानसभा मतदारसंघांसाठीही मतदान होईल.
■ मतदान सकाळी ७ ते संध्याकाळी ६ या वेळेत होईल.
★ पहिल्या टप्प्यातील मतदारांमध्ये ८.४ कोटी पुरुष, ८.२३ कोटी महिला व ११ हजार ३७१ तृतीयपंथीय आहेत.
■ ३५.६७ लाख प्रथम मतदार आहेत. २०-२९ वयोगटातील ३.५१ कोटी युवा मतदार आहेत.
◆ ४१ हेलिकॉप्टर, ८४ विशेष गाडया व सुमारे १ लाख वाहने निवडणूक व सुरक्षा कर्मचाऱ्यांसाठी तैनात केली आहेत.
मतदार संघनिहाय आकडेवारी : -
मतदारसंघ उमेदवार मतदार मतदान केंद्रे
नागपूर २६ २२,२३,२८१ २,१०५
रामटेक २८ २०,४९,०८५ २,४०५
गडचिरोली १० १६,१२,९३० १,८८६
चंद्रपूर १५ १८,३७,९०६ २,११८
भंडारा १८ १८,२७,१८८ ३,११०