प्राथमिक शिक्षक,सेवानिवृत्त शिक्षकांना आर्थिक लाभापासून वंचित ठेवण्याचा शिक्षण व लेखा विभागाचा डाव यशस्वी. ★ दप्तर दिरंगाई चा फटका प्राथमिक व सेवानिवृत्त शिक्षकांना - दोषींवर कारवाई करण्याची पुरोगामीची मागणी ; आंदोलनाचा इशारा.

प्राथमिक शिक्षक,सेवानिवृत्त शिक्षकांना आर्थिक लाभापासून वंचित ठेवण्याचा शिक्षण व लेखा विभागाचा डाव यशस्वी.


★ दप्तर दिरंगाई चा फटका प्राथमिक व सेवानिवृत्त शिक्षकांना - दोषींवर कारवाई करण्याची पुरोगामीची मागणी ; आंदोलनाचा इशारा.


एस.के.24 तास


चंद्रपूर : प्राथमिक शिक्षक,सेवानिवृत्त शिक्षकांचे आदिवासी नक्षलक्षेत्रात कार्यरत शिक्षकांना कार्यरत असेपर्यत एकस्तर वेतनश्रेणीचा लाभ अनुज्ञेय आहे असे परिपत्रक दि.२८ जुलै २०२३ ला मुख्य कार्यकारी अधिकारी जिल्हा परिषद चंद्रपूर यांनी निर्गमीत केले आहे. महाराष्ट्र शासन स्तरावरून कार्यरत शिक्षक व सेवा निवृत्त शिक्षकांचे थकीत रकमा काढण्याकरता पुरेसा निधी पाठविण्यात आला होता.



31 मार्चपूर्वी सदर निधी खर्च करणे आवश्यक होते परंतु तालुकास्तरावरून व जिल्हा स्तरावरून प्रशासनाचे दप्तर दिरंगाईमुळे सदर निधी अखर्चित राहिला आहे. अखर्चित बराचसा निधी शासनाकडे परत गेला.परिणामी या लाभापासून प्राथमिक शिक्षक व सेवानिवृत्त शिक्षक वंचित राहिले आहे.


 शिक्षकांचे एक स्तर थकबाकी ,15 टक्के नक्षलग्रस्तभत्ता , मेडिकल बिल, सेवा काळातील रजा प्रकरण आणि इतर बाबी याकरिता पुरेसा निधी ची तरतूद करण्यात आली होती सदर देयके ऑनलाईन पद्धतीने देणे आवश्यक असताना तसेच जिल्हा परिषदचे मुख्य कार्यकारी अधिकारी विवेक  जानसन यांनी 28/07/2023 एक पत्र काढून सर्व पात्र शिक्षकांना नक्षलग्रस्त भत्ता व एकस्तरची रक्कम देण्याबाबतचे पंचायत समिती स्तरावर कळविण्यात आले होते. 


जुलै ते मार्च पर्यंत 08 महिन्याचा वेळ मिळूनही शिक्षकांची देयके बनविण्यात आली नाही व एकस्तर वेतननिश्चितीची पडतालणीसाठी मुळ सेवापुस्तक जिल्हा परीषद चंद्रपूर ला लेखा विभागात पाठविण्यात आलेली नाही आणि  31 मार्चपर्यंत जिल्हा परिषद ला पंचायत समितीने बिल सादर न केल्यामुळे मार्च महिन्यात शेवटचे दोन-तीन दिवस उरले असताना ढीगभर देय्यके  पाठवण्यात आली.


काही पंचायत समितीने बिल पाठविले नाही . काही पंचायत समितीने ऑनलाईन आयडी तयार केले पण शालार्थ प्रणाली सांभाळणारे लिपीक यांनी मंजुरी दिली नाही त्यामूळे बील मंजूर झाले नाहीं.सदर बीले ऑनलाईन करण्यात जिल्हा परिषद शिक्षण विभाग अपयशी ठरला कारण कर्मचारी कमी आणि देयके जास्त त्यामुळे अनेक शिक्षकांचे देय्यके प्रलंबित राहिली.


बीडीएस 31 मार्चला बंद पडल्यामुळे निधी काढणे शक्य झाले नाही . मात्र सिंदेवाही, चिमूर, गोंडपिंपरी, भद्रावती येथील शिक्षकांचे एकस्तर थकबाकी, प्रोत्साहन भत्ता बील काढण्यात आले.ही बिले काढण्यासाठी अर्थकारण झाल्याची खमंग चर्चा शिक्षकामध्ये असून जिकडे तिकडे चर्चाच सुरू आहेत.यामध्ये जबाबदार असलेल्या अधिकारी कर्मचारी यांची योग्य ती चौकशी करून दोषीवर कारवाई  करण्यात यावी.


असे मागनी महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना चंद्रपूर चे वतीने मुख्य कार्यकारी अधिकारी यांच्याकडे   करण्यात आली . सोबतच 358 सेवानिवृत्त शिक्षकांचे गटविमा प्रकरण निकाली काढण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात यावे अशी मागणी करण्यात आली.निधी आणण्यासाठी प्रशासनाने प्रयत्न करावे अशी विनंती करण्यात आली. निधी न आल्यास व लवकरात लवकर निधी न मिळाल्यास आंदोलन करण्यात येईल.


असे महाराष्ट्र पुरोगामी प्राथमिक शिक्षक संघटना चे राज्यनेता विजय भोगेकर, राज्य सरचिटणीस हरीश ससनकर,महिला पुरोगामी राज्याध्यक्षा अल्का ठाकरे,जिल्हाध्यक्ष,किशोर आनंदवार, जिल्हा सरचिटणीस सुरेश गिलोरकर,जिल्हा कोषाध्यक्ष,सुनिल कोहपरे,जिल्हा कार्याध्यक्ष गंगाधर बोडे,शालिनी देशपांडे,पौर्णिमा मेहरकुरे व सर्वा जिल्हा पदाधिकारी यांनी इशारा दिलेला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !