आरमोरीत भाजप कार्यालयाचे उदघाटन अरविंद सावकार यांचे हस्ते.
गडचिरोली मुनिश्वर बोरकर
गडचिरोली - महायुतीतील भाजपा ' शिवसेना , राष्ट्रवादी कांग्रेस , पिरिपा , रिपाई चे चिमुर लोकसभा क्षेत्रातील अधिकृत उमेदवार माजी खासदार अशोक नेते यांच्या प्रचारार्थ कार्यालयाचे उदघाटन जुना बसस्टॅड आरमोरी येथे सहकार महर्षी अरविद सावकार पोरड्डीवार यांचे हस्ते पार पडले.
प्रकाश सावकार पोरड्डीवार यांचे घरी भाजपाची बैठक पार पडली यात अरविंद सावकार पोरड्डीवार म्हणाले की , विकासाची कामे करणारा पंतप्रधान नरेंद् मोदी यांचे कौतुक करावयासे वाटते. शेतकऱ्यांच्या खात्यात पैसे येत आहेत. शेतकरी आनंदात आपले जिवन जगत आहे. कामगारांच्या हाताला काम मिळत आहे. अनुदान प्राप्त होत आहे. मजुरांच्या हाती पेट्या मिळत आहेत. हे सर्व मोदी करत आहे. महिलामधेही आनंदाचे वातावरण आहे.
हि महाविकास आघाडी व त्यांचे उमेदवार अशोक नेते यांना विजय करावयाचा आहे. त्यांचा विजय होणारच आहे. याप्रसंगी आमदार कृष्णा गजबे , माजी आमदार अतुल देशकर , आदिवासी नेते प्रकाश गेडाम . माजी भाजपा जिल्हाध्यक्ष किसन नागदेवे, भाजप नेते प्रकाश सावकार पोरड्डीवार ' उपाध्यक्ष खुणे ' अरुण हरडे तर आरमोरी तालुक्यातील प्रमुख पंकज खरवडे , सुनिल पारधी , चागदेव फाये , नंदू पेट्टेवार, पवन नारनवरे , नंदू कलंत्री , गणपत सोनकुसरे , भारत बावनथडे , सदानंद कुथे , संगिता रेवतकर , एड उमेश वालदे , वसंत डोनाडकर, आदि लाभले होते.
या प्रसंगी खासदार अशोक नेते म्हणाले की, पंतप्रधान नरेंद्र मोदी वर विश्वास ठेवुन त्यांचा विकासाचा महामेरू गडचिरोली जिल्हयात राबविला असुन रेल्वे लाईन तयार होत आहे. सुरजागड लोह कारखाना,शेतकऱ्यांच्या समस्या सुटत आहेत. मी अनेक विकासाची कामे करीत आहे. भाजपाचे ४०० चा आकडा पार करीत आहे. म्हणुन मला निवडुन द्या व मोदी साहेबाचे हात मजबुत करा असे आवाहनही नेते यां प्रसंगी आमदार कृष्णा गजबे,माजी आमदार,अतुल देशकर,किसन नागदेवते याचीही भाषणे झाली.