काँग्रेस नेते,राहुल गांधी १३ एप्रिल तर प्रियंका गांधी १५ एप्रिलला विदर्भात,या ठिकाणी होणार जाहीर सभा.
एस.के.24 तास
चंद्रपूर : काँग्रेस नेते राहुल गांधी आणि प्रियंका गांधी यांची विदर्भातील भंडारा जिल्ह्यातील साकोली आणि चंद्रपूर येथे प्रचारसभा होत आहे. राहुल गांधी साकोली येथे १३ एप्रिलला आणि प्रियंका गांधी यांची चंद्रपूला १५ एप्रिलला सभा होत आहे.
लोकसभा निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात पूर्व विदर्भातील भंडारा-गोंदिया,गडचिरोली-चिमूर, चंद्रपूर, नागपूर आणि रामटेक येथे १९ एप्रिलला मतदान होत आहे.यासाठी प्रचाराची रणधुमाळी सुरू झाला आहे.प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांचा विधानसभासंघ साकोली आहे. काँग्रेसने भंडारा - गोंदिया लोकसभेसाठी डॉ.प्रशांत पडोळे यांना उमेदवारी दिली आहे. त्यांच्या प्रचारासाठी खुद्द राहुल गांधी येत आहेत.
चंद्रपूर लोकसभा मतदारसंघात प्रतिभा धानोरकर काँग्रेसच्या उमेदवार आहेत.त्यांच्या प्रचारासाठी प्रियंका गांधी चंद्रपूर येथे सभा घेत आहेत. काँग्रेसच्या प्रचार समिती आणि इथर समित्यांची बुधवारी बैठक झाली.यावेळी या दोन्ही प्रमुख नेत्यांच्या पूर्व विदर्भात सभा घेऊन वातावरण निमिर्ती करण्याचा निर्णय घेण्यात आला.