अ-हेरनवरगाव येथील वाचनालयात डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वि जयंती साजरी.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : १५/०४/ २४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव येथे सार्वजनिक वाचनालयाच्या वतीने विश्वरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती साजरी करण्यात आली.या कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतमजी खोब्रागडे शिक्षक आमिर्झा यांनी व उपस्थित मार्गदर्शक अतिथी यांनी क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले,महात्मा ज्योतिबा फुले,
विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांच्या प्रतिमेसमोर दीप प्रज्वलन करून माल्यार्पणाने अभिवादन केले.यावेळी प्रमुख मार्गदर्शक,अतिथी म्हणून प्राध्यापक रोशन मेश्राम अमरदीप लोखंडे,मधुसूदन कांबळे, संगीता मेश्राम उपस्थित होते.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी ग्रंथालयामध्ये स्पर्धा परीक्षेची तयारी करणारे भावी देशाचे हितचिंतक विद्यार्थी सुरज मदनकर ,कार्तिक वैद्य ,संचित लोखंडे, लोकेश बगमारे, मोहित ठेंगरे, रंजीत कुथे ,रजत वैद्य, कार्तिक वैद्य, तनु नंदनवार, साक्षी राऊत,प्राजक्ता करणांकर हे विद्यार्थी, विद्यार्थिनी उपस्थित होते.