लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसला सत्तेत आणा. - ऍड. पल्लवी रेनके
★ व्याहाड खुर्द येथे डॉ.नामदेव किरसान यांचे प्रचारार्थ महिला मेळावा संपन्न.
एस.के.24 तास
सावली : गडचिरोली - चिमूर लोकसभा क्षेत्राचे भारतीय काँग्रेस पक्षाचे उमेदवार डॉ. नामदेवजी किरसान यांच्या प्रचारार्थ व्याहाड खुर्द येथे महिला मेळावा पार पडला.यात काँग्रेसचा वचननामा हा महिलांसाठी लाभदायक असून काँग्रेसला सत्तेत आणण्याचे आवाहन विमुक्त जाती भटक्या जमाती विभागाचे प्रदेश अध्यक्षा ऍड. पल्लवी रेनके यांनी केले.
भाजपचे सरकार हुकूमशाहीचे सरकार असून लोकशाही वाचविण्यासाठी काँग्रेसला सत्तेत आणा. काँग्रेस सरकार हे बहुजनांचा विचार करणारा पक्ष आहे. काँग्रेसने जाहीरनाम्यात ओबीसींची जनगणना व संख्येनुसार आरक्षण देण्याचे जाहीर केले असून महिलांसाठी वर्षाला एक लाख रुपये देत सन्मान करणार असल्याचे जाहीर केल्याने राहुल गांधी यांचे हात बळकट करण्यासाठी गडचिरोली चिमूर लोकसभा क्षेत्राचे उमेदवार डॉ.नामदेव किरसान यांना निवडून आणण्याचे आवाहन केले. महिलांना स्थानिक स्वराज्य संस्थेत आरक्षण दिल्याने वेगवेगळ्या पदावर महिला पोहचल्या असून महिलांचा कायम सन्मान काँग्रेसने केला असल्याचे मत ऍड.कविता मोहरकर यांनी केले.
अध्यक्षस्थानी महिला तालुका अध्यक्ष उषा भोयर होत्या. यावेळी मंचावर व्याहाड खुर्द सरपंचा सुनीता उरकुडे, माजी पंचायत समिती सदस्य मनीषा जवादे, महिला उपाध्यक्ष किरण ढोलने, शिला गुरुनुले,कुडव,कुमरे उपस्थित होते.