मॅजिक बस संस्थेच्या वतीने स्वयंसेवकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण संपन्न.
एस.के.24 तास
चामोर्शी : मॅजिक बस इंडिया फाउंडेशन च्या वतीने स्वयंसेवकांचे तीन दिवसीय प्रशिक्षण पंचायत समिती चामोर्शी येथील प्रशिक्षण भवन येथे आयोजित करण्यात आले, प्रशिक्षण मुख्यतःहा हे प्रशिक्षण गावातील एक जबाबदार नागरिक म्हणून आपले काय कर्तव्य आहे आणि त्याच आधारे आपण गावातील समस्या ओळखून त्यावर कसे काम करून ते कसे सोडवू शकतो.
आणि त्यासाठी कोणत्या कोणत्या घटकांचा समावेश करून घेऊ शकतो यावर हे प्रशिक्षण घेण्यात आले. चामोर्शी तालुक्यातील 18 गावातील युवकांचा यात समावेश होता. हे प्रशिक्षण पार पाडण्यासाठी संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी प्रशांत लोखंडे संदीप राऊत, योगिता सातपुते व दिनेश कामतवार यांनी मार्गदर्शन केले.
सदर प्रशिक्षण यशस्वीतेसाठी मॅजिक बस संस्थेचे युवा मार्गदर्शक प्रफुल निरूडवार, रोशन तिवाडे, सोनाली रनदिवे ,पल्लवी झरकर,राजेश्वर माडेमवार, किशोर किणेकर ,पंकज शंभरकर, अश्विनी उराडे व गावातील समूदाय समन्वयकांनी परिश्रम घेतले. या प्रशिक्षणात विविध गावातील स्वयंसेवक उपस्थित होते.