मतदारांना गडकरींचे नाव भाजपचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या देत होते. " कहो दिल से नितीन जी फिरसे.." असा त्यावर उल्लेख.
★ नागपुरात भाजप - काँग्रेसमध्ये वादावादी.
एस.के.24 तास
नागपूर: नागपूर लोकसभा मतदारसंघात मतदाना दरम्यान शुक्रवारी काही केंद्राजवळील राजकीय पक्षाच्या बुथवर भाजपचे उमेदवार नितीन गडकरी आणि कमळाचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या मतदारांना दिल्या जात होत्या.नारा येथे अशाच प्रकारे मतचिठ्ठ्या देण्यावरून भाजप व काँग्रेस कार्यकर्त्यांमध्ये वादावादी झाली. संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी बुथ वरील यंत्र फोडले.त्यावरून तणाव निर्माण झाला होता.
नागपूर लोकसभा मतदारसंघात शुक्रवारी मतदान पार पडले..शहरातील नारा,जरिपटका, मध्य नागपुरातील नाईक तलाव परिसरात भाजपच्या बुथवर कार्यकर्ते मतदारांना गडकरींचे नाव भाजपचे चिन्ह असलेल्या मतचिठ्ठ्या देत होते. ‘कहो दिल से नितीन जी फिरसे..’ असा त्यावर उल्लेख होता. यावर कॉंग्रेस कार्यकर्त्यांनी अक्षेप घेत ही कृती नियमांचा उल्लंघन करणारी असल्याचा आरोप केला.
त्यानंतर पोलिसांनी गडकरींचा फोटो आणि भाजपचा मतचिठ्ठी काढणारे यंत्र तिथून हटवण्यास सांगितले. यावरून तिन्ही ठिकाणी भाजप- काँग्रेसमध्ये वादावादी झाली.नारा परिसरात संतप्त काँग्रेस कार्यकर्त्यांनी हे चिठ्ठी देणारे यंत्रच फोडले.
तर मध्य नागपुरातील संत कबीर उच्च प्राथमिक आणि हायस्कूल या केंद्रावर आक्षेप घेतल्यावर हे यंत्र पोलिसांनी ताब्यात घेतले.याप्रसंगी भाजपचे सुमारे ३०० कार्यकर्त्यांनी एकत्र येत निदर्शने केली.
आमदार प्रवीण दटके यांनी येथे धाव घेत पोलिसांशी चर्चा केली.दरम्यान पोलिसांनी निवडणूक अधिकाऱ्यांशी संवाद साधला. त्यानंतर हे यंत्र परत करण्यात आले. गेले. परंतु त्यानंतर भाजपने हे यंत्र तेथून हटवले.