शहाण्या माणसाने कोर्टाची पायरी चढू नये. ; अ-हेरनवरगाव येथील गोपाल काला व महाप्रसाद समारोपीय कार्यक्रमाप्रसंगी ठाणेदार,अनिल जीट्टावार यांचे मनोगत.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : २६ /०४/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव येथे हनुमान जयंती प्रित्यर्थ श्रीमद् देवी भागवत रहस्य ग्रामगीता तत्त्वज्ञान रहस्य हरिनाम सप्ताह सुश्री साध्वी दिलाशा मेघशाम ठलाल आणि संच कडोली जिल्हा गडचिरोली यांच्या भागवत व प्रवचनाचा कार्यक्रम दिनांक १९/०४ पासून ते २५/०४/२४ पर्यंत आयोजित केला होता.
या काळात वेगवेगळ्या विषयावरती थोर समाज सुधारक यांच्या जीवनावरती जीवनपट, पौराणीक कथेचे आशय, वेगवेगळ्या झाकी, परंपरागत प्राचीन काळापासून सुरू असलेली विधिवत पूजेचे दृश्य, पालखी, दिंडी- भजना द्वारे गावातून मिरवणूक काढून लोकांना दाखविण्यात आल्यामुळे गावात भक्तिमय वातावरण तयार झाले होते.
कार्यक्रमाच्या समारोपीय गोपाल काला व महाप्रसाद कार्यक्रमाप्रसंगी हनुमान देवस्थान सेवा समिती विश्वस्त च्या पुढाकाराने गावातील वयोवृद्ध आणि सामाजिक सेवा करणारे केशवजी राऊत ,हरिनारायण बेद्रे, सीताबाई मानदेव राऊत, नकटुबाई चिंतामण तलमले, मीराबाई जीबकाटे माजी सरपंच अ-हेरनवरगाव आणि भागवत प्रवचनकार साध्वी दिलाशा मेघशाम ठलाल, हार्मोनियम वादक पेंदोरकर महाराज आवळगांव व संच यांचा शाल श्रीफळ देऊन सत्कार करण्यात आला.
पोलीस स्टेशन ब्रह्मपुरीचे पोलीस निरीक्षक अनिल जीट्टावार मार्गदर्शन करताना त्यांनी सर्वप्रथम लोकसभेची निवडणुक शांतते पार पाडण्यासाठी जनतेने केलेल्या सद्भावपूर्ण सहकार्याबद्दल आभार मानले . कोणत्याही शुल्लक कारणासाठी पोलीस स्टेशनची पायरी जनतेने गाठू नये . सामंजस्याने लहान लहान वाद गावातच मिटवून टाकावे.
कोणतीही लहान तक्रार घेऊन पोलीस स्टेशनला आले तर त्याचा विपरीत परिणाम म्हणजे लवकर न तुटणारी कोर्ट कचेरीची भानगड आणि त्यामुळे शुल्लक वादावादी करणारे , शहाण्या माणसाने कधीही कोर्टाची पायरी चढू नये आणि तसा प्रसंग कोणीही स्वतःवरती येऊ देऊ नये असे मौलिक विचार आणि आवाहन गोपाल काला व महाप्रसाद समारोपीय कार्यक्रमा प्रसंगी उपस्थित भाविक जनसमुदायाला केले.
यावेळी अॅड हेमंत उरकुडे ब्रह्मपुरी, प्रशांत राऊत पत्रकार, दामिनी चौधरी सरपंच, श्रीकांत पिलारे सदस्य ,अमरदीप लोखंडे विलासजी उरकुडे माजी पंचायत समिती सदस्य , वामनराव मिसार, अकुल राऊत पोलीस पाटील, नानाजी बगमारे बगमारे माजी पोलीस पाटील अ-हेरनवरगाव हे उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन व आभार प्राध्या. मंगेश देवढगले यांनी जबाबदारी पार पाडली.