समाजातील नव तरुणांनी व्यसनचा नाद सोडून अभ्यास व स्पर्धा परीक्षेची तयारी करावी. - सौ.वैशाली लोखंडे .
★ अ-हेरनवरगांव येथे डॉ बाबासाहेब आंबेडकर जयंती दिनी व्यक्त केल्या भावना.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी - १६/०४/२४ ब्रम्हपूरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथे विश्वरत्न डॉ बाबासाहेब आंबेडकर यांची १३३ वी जयंती मोठ्या उत्साहात साजरी करण्यात आली.
या जयंती कार्यक्रमाचे अध्यक्ष श्री गौतम खोब्रागडे सर यांनी प्रमुख अतिथी श्री व्यंकटेश खोब्रागडे, युवराज कांबळे, तुलाराम वासनिक,रोशन मेश्राम,संजय मेश्राम धृवा खोब्रागडे,सौ.वैशाली लोखंडे, सौ बिंदिया जनबंधु,
श्रीमती संघमित्रा लोखंडे,नयना क-हाडे यांच्या उपस्थितीत तथागत गौतम बुद्ध,विश्र्वरत डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या पुतळ्यासमोर मोमबत्ति,अगरबत्ती लावली आणि माल्यार्पण करून अभिवादन केले. विचार पिठावर उपस्थित पाहुण्यांनी सुध्दा दोन्ही पुतळ्यांना आणि प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून विनम्र अभिवादन केले.
त्या नंतर कार्यक्रमाचे अध्यक्ष गौतम खोब्रागडे यांनी ध्वजारोहण केल्यानंतर डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनपटावर प्राध्या .रोशन मेश्राम, धृवा खोब्रागडे,नयना क-हाडे या पाहुण्यांनी आपले मनोगत व्यक्त केले.
समाजातील नवतरुणांनी दारू,सट्टा,जुवा,मादक पदार्थ यांच्या आहारी न जाता त्याच वाचलेल्या पैशातून स्पर्धा परीक्षेची पुस्तके घ्यावी आणि व्यसनमुक्त होऊन एकाग्रतेने स्पर्धा परीक्षेची तयारी करून मोठे अधिकारी व्हावे असे मौलिक मार्गदर्शन सौ वैशाली लोखंडे यांनी उपस्थित नव तरुणांना केले.अध्यक्षीय भाषणानंतर बुद्ध वंदना घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली.
कार्यक्रमाचे सूत्रसंचालन विशाल जनबंधू करून मोठ्या संख्येने उपस्थित बौद्ध उपासक - उपासिका यांचे आभार मानले.आचारसंहितेचे चित्र डोळ्यापुढे ठेवून कार्यक्रमाच्या शांत पूर्ण यशस्वीतेसाठी सर्व बौद्ध बांधवांनी मोलाचे सहकार्य केले.