बैलबंडी वर फिरली गावभर नवरदेवाची वरात ; जुन्या परंपरेला दिला उजाडा.

बैलबंडी वर फिरली गावभर नवरदेवाची वरात ; जुन्या परंपरेला दिला उजाडा.


अमरदीप लोखंडे - सहसंपादक 


ब्रह्मपुरी- २३/०४/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेरनवरगाव येथील रहिवाशी सौ. गिताबाई गोवर्धन ठेंगरे यांचा मुलगा मोहन याचा सौ. वनिता बाई रामचंद्र नाकतोडे यांची मुलगी पूजा राहणार उदापूर हिच्याशी विवाह सोहळा दिनांक २१/०४/२४ रविवारला नवरदेव मंडपी पार पडला.

 

नवरदेवाने आपली वरात आधुनिक परंपरेला बगल देत चार चाकी गाडीची सजावट न करता घरी असलेल्या बैलबंडीची सजावट करून गावभर वाजत गाजत लग्न वरातीची मिरवणूक काढून स्वगृही विवाह सोहळा पार पाडला.


घरचे थोडेफार श्रीमंत असून देखील खर्चावर नियंत्रण ठेवून वधुपक्षाच्या लग्न खर्चाचा भार स्वतःउचलून कमीत कमी खर्चामध्ये विवाह सोहळा पार पाडला हा एक आदर्श त्यांनी अ-हेरनवरगाव येथील जनतेपुढे ठेवला.


त्यांच्या या बैलबंडी वरातीची चर्चा परिसरात चर्चेचा विषय बनली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !