धनगर संवाद मेळाव्याकडे समाजाने फिरवली पाठ - समाजाचा मेळावा नसून भाजपचा मेळावा असल्याची चर्चा.
एस.के.24 तास
मुल : जुनासुर्ला येथे धनगर समाज मेळाव्याचे 15 एप्रिल ला आयोजन करण्यात होते मात्र हा मेळावा समाजाचा नसून भाजपचा आहे अशी चर्चा सोशल मीडिया, समाजात सुरु झाल्याने व समाजाच्या कार्यात नियमित झटणारे पदाधिकारी कार्यक्रमात उपस्थित राहणार नसल्याची माहिती पोहचल्याने समाजाने कार्यक्रमात जाणे टाळले. हा मेळावा मंचावर भाजपच्या इतर समाजाच्या पदाधिकारी व भाजपच्या समाजाच्या पदाधिकारी यांना घेऊन पार पडला. मात्र ज्यांच्यासाठी हा मेळावा आयोजित केला होता त्या समाजाने भाजपचा मेळावा असल्याचे लक्षात आल्याने पाठ फिरवली.
मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथे डॉ. मंगेश गुलवाडे प्रमुख मार्गदर्शक असलेला धनगर संवाद मेळावा आयोजित केला होता. या परिसरात धनगर समाजातील पोटजात कुरमार समाज मोठ्या प्रमाणावर असून मेंढया पाळणे हा व्यवसाय आहे.
या भागातील मतदार संख्येचा विचार करून भाजपचे उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचे समाजातील कार्यकर्त्यांनी मतावर डोळा ठेऊन कार्यक्रम आखला होता. ज्या वेळेस कार्यक्रम पत्रिका समाजापर्यंत पोहचली तेव्हा वाट्सअँप सोशल मीडियावर अनेकांनी आक्षेप घेतला. फक्त निवडणुकीसमोर मेळावा का घेतल्या जात आहे? मागील विधानसभा वेळी घेण्यात आलेल्या मेंढपाळ परिषदेतील किती प्रश्न सोडविले ? डॉ.मंगेश गुलवाडे कोण ?
या भागातील समाजासाठी गुलवाडे यांनी काय केले? पत्रिकेत नावे कोणाला विचारून टाकली? या भागात नेहमी समाजासाठी अहोरात्र काम करणारे डॉ. तुषार मर्लावार, संजय कन्नावार यांचे नाव मार्गदर्शकात न ठेवता आयोजक यादीत ठेऊन अपमान करण्याचा प्रयत्न आहे का ? अशा विविध प्रश्नांची सरबती केली व अनेकांनी फोन करून आपण या कार्यक्रमात येऊ नये ही विनंती केली. समाजात दुफळी निर्माण होऊन समाजाचा नुकसान होऊ नये यासाठी
डॉ.तुषार मर्लावार,संजय कन्नावार,विजय कोरेवार यांनी उपस्थित राहणार नसल्याचे जाहीर केले.या भागाचे नेतृत्व करणारे उपस्थित राहणार नसल्याने समाजाने कार्यक्रमास जाणे टाळले. त्यामुळे रिकाम्या खुर्च्यात भाजपच्या पदाधिकारी व कार्यकर्त्यांना घेऊन कार्यक्रम पार पाडण्याची नामुष्की ओढवली.