पोलीस हवालदार चा आरोपी च्या पत्नीवर बलात्कार ; रक्षक बनला भक्षक.
★ घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली.
एस.के.24 तास
चंद्रपूर : स्थानिक गुन्हे शाखेच्या पथकात कार्यरत पोलीस हवालदाराने आरोपीच्या पत्नीवर बळजबरीने बलात्कार केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे. याप्रकरणी पोलीस हवालदार संजय आतकुलवार यास अटक करण्यात आली आहे.या घटनेमुळे पोलीस प्रशासनात खळबळ उडाली असून पोलिसांची प्रतिमा मलीन झाली आहे.हवालदार आतकुलवार विविध अवैद्य व्यावसायिकांकडून हप्तावसुली करीत असल्याचीही पोलीस वर्तुळात चर्चा आहे.
पतीला एका प्रकरणातून वाचवण्यासाठी मदत करतो, असे सांगून त्या मोबदल्यात आतकुलवार याने वर्षभर शारीरिक संबंध ठेवून बलात्कार केला, अशी तक्रार पीडित महिलेने केली आहे.तसेच वारंवार व्हिडीओ कॉल करून धमकी देत असल्याचेही तक्रारीत नमूद आहे. प्रकरणाचे गांभीर्य लक्षात घेत पोलीस अधीक्षक मुमक्का सुदर्शन यांच्या अध्यक्षतेत उपविभागीय पोलीस अधिकारी सुधाकर यादव यांनी तपासाला सुरुवात केली.गुन्हा दाखल करून आरोपी पोलीस हवालदार संजय आतकुलवार यास बुधवारी अटक केली.
हवालदार आतकुलवार हा विविध अवैद्य व्यावसायिकांकडून हप्तावसुली आणि अवैध धंद्यांमध्ये गुंतला असल्याचे आता बोलले जात आहे. या घटनेमुळे पोलीस प्रशासनाची लक्तरे वेशीवर टांगली गेली आहे.