विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णास आर्थिक मदत.
एस.के.24 तास
सावली : तालुक्यातील हरांबा व उमरी येथे राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या तर्फे कॅन्सरग्रस्त रुग्णांना सावली तालुका युवक काँग्रेसचे अध्यक्ष मा.किशोर कारडे व ग्राम काँग्रेस कमिटी हरांबाचे अध्यक्ष मा.मोहन कुनघाडकर यांच्या वतीने सदर मदत देण्यात आली.
सविस्तर वृत्त असे की, हरांबा येथील ताराबाई गेडाम वय ५२ वर्षे व उमरी येथील शिवराम गेडाम वय ४९ वर्षे हे दोन्ही रुग्ण गरीब कुटुंबातील असून भूमिहीन शेतमजूर आहेत मिडेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत होते, मागील काही दिवसापासून ते उपचार घेत होते.
परंतु वारंवार तबेत बिघडत चालल्याने पुढील उपचार घेत असताना या दोन्ही रुग्णांना कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले.उपचारासाठी मदत हवी असल्याची माहिती सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने यांना मिळताच राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून सदर मदत मिळवून दिली.
आर्थिक मदत देताना हरांबाचे सरपंच मा.देवानंद मानकर,उपसरपंच मा.प्रवीण संतोषवार,ग्रामपंचायत सदस्या सौ.प्रीती गेडाम तसेच मा.तुळशीदास वाकडे,मा.संतोष गेडाम,मा.ईश्वर भोयर,मा.वासुदेव कारणेवार ,मा.काशिनाथ गेडाम आदी उपस्थित होते.