पत्रकार भाष्कर सहारे यांचे निधन.
मुनिश्वर बोरकर
चंद्रपूर - भाष्कर सहारे ६५ यांचे आज दि,30 एप्रिल सकाळी ८ वाजता दिर्घ आजाराने निधन झाले. भाष्कर सहारे यांचे मुळगाव चिंगली (मोहली) ता. धानोरा येथील रहिवासी होते. ते चंद्रपूर जिल्हयात पठाणपुरा येथे आपल्या कुटुंबासोबत राहत होते.
त्यांचे पश्चात पत्नी दोन मुले अशा परिवार असुन त्यांनी आपल्या आयुष्यात समाजसेवा , गोरगरीबांना न्याय मिळवून देणे तसेच उत्तम पत्रकार म्हणुन नावारूपाला आले होते. आज दि. 30 एप्रिल सायंकाळी ५ वाजता पठाणपुरा येथील त्यांचे राहते घरुन अंतंयात्रा निघेत व त्यांना श्रद्धाजली वाहण्यात येईल अशी माहीती त्यांचे पुत्र गोल्डी भाष्कर सहारे यांनी दिली.