इंदीरा गांधी विद्यालय तथा क. महाविद्यालय,येनापुर येथे स्वा.भाऊराव फुलकलवार यांची पुण्यतिथी साजरी.
एस.के.24 तास
चामोर्शी : गोंडवाना शिक्षण प्रसारक मंडळ, येनापूर चे प्रथम अध्यक्ष स्वः श्री भाऊराव मुलकलवार यांची दहावी पुण्यतिथी इंदीरा गांधी तथा विद्यालय तथा क.महाविधालय येनापूर येथे साजरी करण्यात आली: याप्रसंगी कार्यक्रमाला अध्यक्ष म्हणून संस्थेचे सचिव,श्री जयंतराव येलमूले उपस्थित होते.
तर प्रमूख प्रमुख पाहूणे म्हणून संस्थेचे कोषाध्यक्ष श्री दामोधर भाऊ चनूर सदस्य श्री रेकचंदजी राऊत श्री अतूल भाऊ येलमूले, पर्यवेक्षक श्री वासूदेवराव गोंगले कनिष्ठ महाविद्यालय प्रमुख श्री दीलीपराव टेप्पलवार उपस्थित होते. कार्यक्रमाचे प्रास्ताविक विद्यालयाचे प्राचार्य श्री अशोकराव वाकूडकर यांनी केले तर कार्यक्रमाचे संचालन डॉ. विठ्ठलराव चौथाले यांनी केले. कार्यक्रमाचे औचित्य साधून मानव विकास मिशन अंतर्गत 'आलेल्या सायकली विद्यार्थीनीना वाटप करण्यात आल्या.
याप्रसंगी मान्यवरांनी आणि शिक्षकांनी स्वर्गीय अध्यक्षांप्रती आपल्या भावना माणि आठवणीला उजाडा देण्याचा प्रयत्न केला.स्वर्गीय अध्यक्षांनी संस्थेसाठी दिलेले योगदान आणि केलेले परिश्रम चाची सर्वांनी स्मरण करून त्यांना अद्धाजंली अर्पण करण्यात आली.