झाडीबोली शबदसाधकांची संगीतरजनी पद्मश्री डॉ.परशुराम खुणेंची उपस्थीती.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपूरी : ०२/०४/ २०२४ ब्रम्हपूरी येथील डॉ लंजे यांच्या निवासस्थानी पद्मश्री डॉ परशुराम खुणेंच्या उपस्थितीत झाडीपट्टी कलावंत तथा शब्दसाधकांची संगीतरजनी कार्यक्रम पार पडला.
विशेष म्हणजे थोर नाटयकलावंत छोटा गंधर्वाची हार्मोनियम डॉ लंजेनी एक संस्मरणीय आठवण म्हणून आणलेली आहे.ही हार्मोनियम पायने वाजवायची असून छोटे गंधर्वाची ती अनोखी ठेव आहे.या हार्मोनियमवर स्वतः पद्मश्री यांनी सूर लावून तबल्याची साथ डॉ लंजेंनी दिली.झाडीबोलीचे भाष्यकार,कवी डॉ धनराज खानोरकरांनी काही नाटयगीते म्हंटली.इतरांनीही आठवणीतील म्हणजे एकच प्याला,सिंहाचा छावा,कटयार काळजात घुसली,संगीत सौभद्र इ.नाटकातील नाटयगीते गाऊन ही संगीतरजनी पार पडली.उपस्थितांनी याचा आस्वाद घेतला.
छोटया गंधर्वाची हार्मोनियम हा आपल्या आठवणीतला अनमोल ठेवा असून आपण केव्हाही यावे,आम्ही आपले हार्दिक स्वागत करु! असे विचार डॉ लंजेंनी याप्रसंगी मांडले.