मंगेश गुलवाडे यांचा धनगर समाज "अ (?)" संवाद मेळावा.!
★ भाजप उमेदवार सुधीर मुनगंटीवार साठी धोक्याची घंटा.
एस.के.24 तास
चंद्रपूर : धनगर समाजाचे अनेक प्रश्न आवासून उभे आहेत. धनगर समाजात नामसदृशाचा फायदा घेत काही बोगस झाडे हे धनगर आरक्षणात घुसत आहेत.अनेक बोगस झाडे यांना धनगर आरक्षणात नोकरी मिळवली आहे. मेंढपाळांचे चराई प्रश्न अत्यंत जिव्हाळ्याचा प्रश्न आहे.धनगर समाजात असे अनेक प्रश्न आवासून उभे असतांना सुद्धा या प्रश्नाकडे डॉ.मंगेश गुलवाडे यांनी कधी या प्रश्नाला गंभीरतेने हाताळले नाही.असे असतांना सुधीर मुनगंटीवार यांच्या समोर आपणचं धनगर नेता असल्याचा आव आज गुलवाडे यांचे कडून दाखविला जात आहे.
समाजात गुलवाडे यांनी न केलेले कार्य हे सर्वश्रुत आहे. " लबाड लांडगा ढोंग करतयं ! " अशी चर्चा सध्या या क्षेत्रात सुरू आहे.स्वतःचे नसलेले धनगर समाजातील अस्तित्व पक्षांसमोर दाखवून डॉ.मंगेश गुलवाडे यांनी उच्चशिक्षीत व कर्मठ पदाधिकाऱ्यांना डावलून सोमवार दि.१५ रोजी मुल तालुक्यातील जुनासुर्ला येथे " धनगर जमात संवाद " मेळाव्याचे केलेले आयोजनावर आत्ता धनगर समाजातील वरिष्ठ बांधव व पदाधिकारी यांनी रोष व्यक्त करीत आहे.
समाज बांधवांसमोर स्वत:चा " उदो - उदो " करून भाजप चे लोकसभा उमेदवार सुधीर मुनगंटीवार यांचा पराभव करायचा हा गुलवाडे यांचा " गेम प्लॅन " समाज बांधवांकडून नक्कीच उधळला जाणार आहे.कोणत्याही समाज बांधवांशी संवाद न साधता घेण्यात येणारा हा "असंवाद मेळावा " असल्याची टिका धनगर समाज बांधव करीत आहे.
प्रमुख मार्गदर्शक डॉ.गुलवाडे आहेत पण त्यांना मुल तालुक्यात समाज ओळखत नाही व ज्या आयोजकांची नावे टाकलेली आहेत त्या कार्यकर्त्यांनी आम्हाला न विचारता नावे पॅम्प्लेटवर टाकली कशी ? असा आक्षेप घेतला आहे. व डॉ.तुषार मर्लावार व संजय कन्नावार हे या भागातील समाजाचे नेतृत्व करणारे व्यक्ती असताना त्यांची नावे आयोजकामध्ये असल्याने समाजात असंतोष पसरला आहे.
सविस्तर वृत्त असे की,डॉ. मंगेश गुलवाडे यांचे समाज बांधवांसाठी कोणतेही उल्लेखनीय कार्य नाही.आपली प्रसिद्धी करण्यासाठी आपले नेतृत्व गाजवण्यासाठी या क्षेत्रामध्ये कार्य करणाऱ्या कोणत्याही नेत्याला ज्यात समाजाचे डॉ.तुषार मर्लावार सारख्या समाजातील उच्चशिक्षीत बांधवांना डावलून तसेच समाजासाठी सदैव कार्यरत असणारे राष्ट्रीय समाज पक्षाचे व धनगर समाजाचे नेते संजय कन्नावार,धनगर समाजाचे नेते विजय कोरेवार यांना कोणतीही विचारणा न करता आयोजित करण्यात आलेला " धनगर जमात संवाद मेळावा " धनगर समाजामध्ये असंतोष निर्माण करीत आहेत.
पाॅम्लेट प्रकाशित करून सोमवार दि.१५ रोजी घेण्यात येणाऱ्या या कार्यक्रमाला गावातून विरोध तर होतच आहे पण इतर ठिकाणी विरोध होता आहे ज्यांनी कधी या क्षेत्रामध्ये सामान्य लोकांच्या कामांसाठी कधी ढुंकूनही पाहीले नाही किंवा त्याला ए.सी.(एअर कडीशन) च्या व्यतिरिक्त त्याला जाण नाही अशा या डॉक्टरांनी समाजामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न चालू केला आहे आज कुरमार व धनगर समाजामध्ये या अशा कारणामुळे समाजात दोन पक्ष निर्माण करण्याचा प्रयत्न सुरू झाला आहे याचा फटका सुधीर मुनगंटीवार यांना नक्कीच पडू शकतो.
या भागात काम करणारे सुखदुःखात सहभागी होणारे धनगर बांधव मात्र त्यांना कुठेही विचार न करता सरळ जाऊन भाजपाच्या दोन - चार कार्यकर्त्यांना भेटून आपलं नेतृत्व या ठिकाणी उभं करण्याचा गुलवाडे यांचा प्रयत्न समाजात मीटिंग घेऊन याच्या विरोधात वेगळे वातावरण सुरू झाले आहे.
याचा फटका सुधीरभाऊ मुनगंटीवार यांनाच पडणार आहे,यावर सुधीर मुनगंटीवार यांनी फेरविचार करावा, अशी मागणी या परिसरात होऊ लागली आहे.आज जुनासुर्ला येथील कार्यक्रमात अनेक समाजाचे पदाधिकारी पाठ फिरवणार असल्याची कुजबुज सुरु आहे.