यशस्वी माजी विद्यार्थ्यांकडून आजी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी शिक्षक,पालक व माजी विद्यार्थी सभा. - अशोक भैयांचे प्रतिपादन
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : १२/०४/२०२४ " आपल्या महाविद्यालयाचे माजी विद्यार्थी देश- विदेशात मोठया पदावर आहेत.अनेक विद्यार्थ्यांनी आपल्या संस्थेचा नावलौकिक वाढविलेला असून गरजू,होतकरु विद्यार्थ्यांना मदत करण्यासाठी आपली नोंदणीकृत माजी विद्यार्थी संघटना, व्यवस्थापन सदैव तत्पर असते, त्यामुळे आपले विद्यार्थी घडतात.अशा यशस्वी माजी विद्यार्थ्यांकडून आजी विद्यार्थ्यांनी प्रेरणा घ्यावी " असे बहूमोल मार्गदर्शन नेवजाबाई भैया हितकारिणी शिक्षण संस्थेचे सचिव अशोक भैयांनी केले.ते शिक्षक,पालक व माजी विद्यार्थी सभेप्रसंगी उद् घाटक म्हणून बोलत होते.
विचारपीठावर अध्यक्षस्थानी प्राचार्य डॉ डी एच गहाणे तर प्रमुख अतिथी म्हणून माजी विद्यार्थी डॉ.अरविंद नाकाडे, उपप्राचार्य डॉ सुभाष शेकोकर, समिती प्रभारी डॉ राजू आदे उपस्थित होते.यावेळी पाहूण्यांच्या हस्ते यशस्वी माजी विद्यार्थी डॉ.हर्षा वेलथरे,प्रा निरंजन मिसार,प्रितम मोरांडे, मोहनिस उराडे,संदिप धोटे यांचा हृदय सत्कार करण्यात आला.यानंतर संस्था सचिव अशोक भैयांनी मदत म्हणून दिलेले ५०,०००/रु निधीची १०० विद्यार्थ्यांना शिष्यवृत्ती प्रदान करण्यात आली.
यावेळी डॉ अरविंद नाकाडेंनी,जिद्द,चिकाटी, परिश्राशिवाय यश मिळत नाही.अभ्यास केंद्र मानून वाटचाल करावी,असे मार्गदर्शन केले.पाहूण्यांच्या भाषणानंतर अध्यक्षीय मनोगतात प्राचार्य डॉ.गहाणेंनी,आपली माजी विद्यार्थी संघटना सजग असून विद्यार्थी हा केंद्रबिंदू मानून महाविद्यालयात विविध उपक्रम व योजना सुरू असतात.विद्यार्थ्यांनीही आणि पालकांनीही आम्हाला आपले मनसुबे सांगावे,ते आम्ही करु ! असे आवाहन केले.पालकांतर्फे श्री.मोरांडे व प्रा मनिषा लेनगुरेंनी आपले विचार मांडले.
या कार्यक्रमाचे प्रास्ताविक व परिचय प्रभारी डॉ राजू आदेंनी केले.संचालन डॉ प्रकाश वट्टी तर आभार प्रा वनश्री नाकतोडेंनी मानले.यशस्वीतेसाठी डॉ धनराज खानोरकर,प्रा आनंद भोयर,डॉ अतुल येरपुडे, प्रा जयेश हजारे,प्रा परातेंनी सहकार्य केले.