गडचिरोली वनविभागात तीन महीन्यांपासून कुप कटाई कामाची मजूरी थकीत.

गडचिरोली वनविभागात तीन महीन्यांपासून कुप कटाई कामाची मजूरी थकीत.


एस.के.24 तास


धानोरा : दक्षिण वनपरिक्षेत्रा अंतर्गत येणाऱ्या मजुरांमार्फत विभागीय रित्या कूप क्र ५ चे  कूप कामे करून घेण्यात आली.मात्र काम पूर्ण होऊनही संबंधित मजूरांना मागील तीन महिन्यांपासून कामाची मजूरी मिळाली नाही.त्यामुळे आर्थिक संकटात सापडलेले मजूर वनविभागाप्रती तीव्र नाराजी व्यक्त करीत आहेत.

      

धानोरा दक्षिण वनपरिक्षेत्रा अंतर्गत येत असलेल्या वनक्षेत्रात जानेवारी महिन्यात मजूरामार्फत आय. डबल्यु. सी कूप क्र ५ फेलिंग सिरीज कोंदावाही कूप कटाईची कामे करवून घेण्यात आली होती.


यामध्ये ढवळी,वाघभूमी धानोरा,परसविहीर,आदी गावातील मजूरांनी काम केले.मात्रकाम पूर्ण होऊनही तीन महीन्याचा कालावधी लोटूनही संबंधित मजूरांना कामाचा मोबदला मिळालेला नाही.सदर मजुराद्वारे थकीत वेतनासाठी क्षेत्रीय कर्मचाऱ्यांकडे विचारणा केली असता समाधानकारक उत्तरे मिळत नसल्यांच्या तक्रारी आहेत. सतत वनरीक्षेत्र कार्यालयात हेलपाटे मारावे लागत वनपरिक्षेत्र अधिकारी यांना सदर मजूरी बाबत विचारणा केली असता.


वरीष्ठकार्यालया कडून कुप कामाची निधी उपलब्ध नसल्यामुळे मजूरी देण्यात आलेली नाही.निधी उपलब्ध होताच मंजुरी अदा केली जाणार असल्याचे सांगितले. मजूरीमुळे मजूरांच्या कुटुंबीयांवर उपासमारीची पाळी आली आहे.त्यामुळे वरिष्ठ अधिकार्यानी याकडे जातीने लक्ष घालून थकीत मजूरी मिळवून द्यावी अशी मागणी मजूरांनी  केली आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !