महाविद्यालयीन विद्यार्थ्यांचा नगरपंचायत इथे अभ्यास दौरा.
रोशन बोरकर - सावली
सावली : स्थानिक राष्ट्रपिता महात्मा गांधी कला वाणिज्य व विज्ञान महाविद्यालय सावली येथील राज्यशास्त्र विभागाचे वतीने नगरपंचायत सावली येथे अभ्यास दौरा आयोजित केलेला होता. या अभ्यास दौऱ्याला महाविद्यालयातील राज्यशास्त्र विषयाच्या विद्यार्थ्यांनी सहभाग दर्शविला.
अभ्यास दौऱ्याच्या निमित्ताने सर्व विद्यार्थ्यांना नगरपंचायत येथील कामकाज कशा पद्धतीने चालविला जातो ? कोणकोणते विभाग असतात, सभापती व उपसभापतीचे दालन, मुख्याधिकाऱ्यांचे दालन, सभेचे सभागृह इत्यादी विषयी माहिती देण्यात आली.
तसेच नागरपंचायत कडे असलेले साहित्य उदा.ॲम्बुलन्स, फायर ब्रिगेड ची गाडी, शववाहीका ,कचरा वाहतूक वाहन इत्यादीची माहिती देण्यात आली. राज्यशास्त्र विभाग प्रमुख अशोक खोब्रागडे व प्रा. साकेत बलमवार यांनी या अभ्यास दौऱ्यात नगरपंचायत च्या कामकाजाबद्दल मार्गदर्शन केले. विद्यार्थ्यांना सुद्धा प्रत्यक्षरीत्या नगरपंचायत ला भेट दिल्यामुळे ज्ञान अवगत झाल्याचे त्यांना समाधान वाटले.