संत निरंकारी मंडळ शाखा गडचिरोलीच्या वतीने ; महिला व बाल रुग्णालयात 50 दात्यांनी केले रक्तदान.
एस.के.24 तास
गडचिरोली : संत निरंकारी चॅरिटेबल फाऊंडेशन दिल्ली, शाखा गडचिरोलीच्या वतीने शनिवारी महिला व बाल रुग्णालयात रक्तदान शिबिराचे आयोजन करण्यात आले होते. या शिबिरात एकूण 50 रक्तदात्यांनी रक्तदान करून सामाजिक दायित्व निभावले.
शिबिराचे उद्घाटन महिला व बाल रुग्णालयाचे वैद्यकीय अधीक्षक डॉ.माधुरी किलनाके यांनी केले.अध्यक्षस्थानी गडचिरोली शाखा मुखी गजानन तुनकलवार होते.प्रमुख अतिथी म्हणून मु स्त्रीरोगतज्ज्ञ डॉ.प्रशांत आखाडे, सेवादल संचालक राजेश गुंडेवार,शिक्षक वसंत मेडेवार,डॉ.चिन्ना करेवार मान्यवर उपस्थित होते. याप्रसंगी 50 रक्तदात्यांनी स्वेच्छा रक्तदान केले.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी गडचिरोली सेवादलाचे सेवादल बहण व जिल्हा सामान्य रुग्णालयातील डॉ.साखरे,त्यांची चमू तसेच महिला रुग्णालयातील चमू,रक्त संक्रमण अधिकारी डॉ.किशोर ताराम यांनी सहकार्य केले.