10 नक्षलवादी ठार 3 महिला चा समावेश ; छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई.

10 नक्षलवादी ठार 3 महिला चा समावेश ; छत्तीसगड पोलिसांची मोठी कारवाई.


एस.के.24 तास


गडचिरोली : छत्तीसगडमधील अबुझमाडच्या जंगलात पोलीस-नक्षलवाद्यांमध्ये उडालेल्या चकमकीत दहा नक्षलवादी ठार झालेत.यात तीन महिलांचा समावेश आहे. नारायणपूर च्या कांकेर सीमावर्ती भागात महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडली.


छत्तीगडमधील नारायणपूर पोलीस नक्षलविरोधी अभियान राबवित होते.यावेळी नक्षलवाद्यांनी पोलिसांच्या दिशेने गोळीबार केला. प्रत्युत्तरादाखल पोलिसांनीदेखील गोळीबार केला.यात १० नक्षलवादी ठार झाले.बस्तरचे पोलीस महानिरीक्षक पी.सुंदरराज यांनी दिलेल्या माहितीनुसार, घटनास्थळी दहा नक्षलवाद्यांचे मृतदेह सापडले आहेत. 


यात तीन महिला नक्षलवाद्यांचा समावेश आहे. याशिवाय एके ४७ सह मोठ्या प्रमाणात शस्त्रे आणि दारूगोळा जप्त करण्यात आला आहे.


जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित : -

महाराष्ट्र दिनाच्या पूर्वसंध्येला ही घटना घडल्याने जिल्ह्यात हाय अलर्ट घोषित करण्यात आला आहे.सीमावर्ती भागांमध्ये नक्षलविरोधी अभियान गतिमान करण्यात आले असून यंत्रणा सजग झाली आहे.


मृतांची ओळख पटलेली नाही : -

या घटनेतील मृत नक्षलवाद्यांची ओळख पटविण्यात अद्याप सुरक्षा यंत्रणेला यश आले नाही. यातील काही नक्षलवादी हे गडचिरोली जिल्ह्याशी संबंधित असल्याचा संशय आहे.अबुझमाड जंगलातील नक्षल कारवाईत या सर्वांचा सहभाग असू शकतो असा छत्तीसगड पोलिसांचा कयास आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !