लोकसभा निवडणुकीत तेली समाजाची तटस्थ भूमिका ; समाज बांधव एकत्रित निर्णय घेणार.

लोकसभा निवडणुकीत तेली समाजाची तटस्थ भूमिका ;  समाज बांधव एकत्रित निर्णय घेणार.


एस.के.24 तास


चंद्रपूर : काँग्रेसचे माजी जिल्हाध्यक्ष तथा महाराष्ट्र तैलिक महासंघाचे उपाध्यक्ष प्रकाश देवतळे यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देऊन भाजपात प्रवेश केल्यानंतर तेली समाजातील विविध संघटनेच्या पदाधिकाऱ्यांची आज बैठक झाली. लोकसभेत तटस्थ राहून एकत्रित निर्णय घेण्याचे बैठकीत ठरविण्यात आले.


बैठकीत उपस्थित सर्व पदाधिकाऱ्यांनी केलेल्या सूचनेनुसार समाजबांधवांनी तटस्थ राहून एकत्र येऊन निर्णय घेण्याचे ठरवले. तुकुम येथील मातोश्री सभागृहात झालेल्या बैठकीत तेली समाजाच्या विविध संघटनांचे पदाधिकारी उपस्थित होते. यामध्ये विदर्भ तेली महासंघ जिल्हाध्यक्ष सूर्यकांत खणके, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा जिल्हाध्यक्ष अजय वैरागडे, तैलिक युवा एल्गार संघटना जिल्हाध्यक्ष जितेंद्र इटनकर, तैलिक महिला एल्गार संघटना जिल्हाध्यक्ष चंदाताई वैरागडे, विदर्भ तेली महासंघ महिला जिल्हाध्यक्ष मीनाक्षी गुजरकर, तैलिक युवा एल्गार संघटना शहर अध्यक्ष माजी नगरसेवक आकाश साखरकर, विदर्भ तेली महासंघ जिल्हा कार्याध्यक्ष गोविल मेहरकुरे, महाराष्ट्र प्रांतिक तैलिक महासभा युवा जिल्हाध्यक्ष तथा सिनेट सदस्य निलेश बेलखडे, माजी नगरसेवक रवींद्र जुमडे, तेली युवा एल्गार संघटनेचे जिल्हा सचिव विकास घटे, तेली समाजाचे युवा नेते शैलेश जुमडे, तैलिक युवा एल्गार संघटना सहसचिव योगेश देवतळे यांची उपस्थिती होती. या बैठकीत सर्व तेली संघटनांनी एकत्र येऊन काही दिवसात समाजाची पुढची दिशा जाहीर करणार असल्याचे सांगितले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !