आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर व महिला पुरस्कार सोहळा संपन्न.

आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर व महिला पुरस्कार सोहळा संपन्न.


एस.के.24 तास


वर्धा : लॉयन्स क्लब वर्धा,सर्वदेशिक सत्यसमाज,स्पोर्ट कराटे असोसिएशन वर्धा जिल्हा, तथा सेंट थॉमस इंग्लिश स्कूल अँड ज्युनिअर कॉलेज वर्धा यांच्या संयुक्त विद्यमाने आयोजित जागतिक महिला दिनानिमित्त आत्मसंरक्षण प्रशिक्षण शिबिर व स्वामी सत्यभक्त महिला पुरस्कार सोहळा 9 मार्च रोजी बोरगाव मेघे येथील सत्येश्वर हॉल येथे मोठ्या उत्साहात पार पडला.

    


याप्रसंगी कार्यक्रमाचे उद्घाटक म्हणून पंजाब हरियाणा उच्च न्यायालयाचे माजी न्यायमूर्ती अरुण चौधरी,कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी मानवाधिकार आयोग महाराष्ट्राचे माजी अध्यक्ष सि. ए. थुल होते तर प्रमुख अतिथी म्हणून सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता सतीश अंभोरे, लॉयन्स क्लबच्या पूर्व प्रांतपाल लॉ.प्रतिभा विनोद अदलखिया


नागपूरचे माजी पोलीस उप आयुक्त चंद्रकांत उदगीकर, जमील अहमद,शास्त्री सोशल फोरमचे राष्ट्रीय उपाध्यक्ष इमरान राही, लॉयन्स क्लबचे अध्यक्ष लॉ. विजय सत्याम, स्पोर्ट कराटे असोसिएशनचे सचिव मंगेश भोंगाडे, अध्यक्ष सतीश इखार, कार्याध्यक्ष तथा बोरगाव मेघेचे सरपंच संतोष सेलुकर, सेंट थॉमस इंग्लिश स्कूलच्या प्राचार्य सौ प्रीती सत्याम, माजी असिस्टंट पोलीस कमिशनर गंगाधरजी पाटील व इत्यादी मान्यवर मंचावर उपस्थित होते.

        

कार्यक्रमाच्या पहिल्या टप्प्यात दुपारी 12 ते 5 वाजेपर्यंत जागतिक महिला दिनानिमित्त निशुल्क युती व महिलांकरिता स्वसंरक्षण प्रशिक्षण शिबिर उत्कृष्टरित्या पार पडले. या शिबिरात महिला प्रशिक्षक सेन्साई पूजा गोसटकर व सेन्साई वाणी साहू यांनी प्रशिक्षक म्हणून सेवा प्रदान केल्याबद्दल मंचावर त्यांचा सन्मान सत्कार करण्यात आला.

     

कार्यक्रमाच्या दुसऱ्या टप्प्यात सायंकाळी 5 वाजता मंचावर उपस्थित सर्व मान्यवरांच्या शुभहस्ते सन्माननीय सत्कारमूर्ती म्हणून लाभलेल्या सुप्रसिद्ध चिकित्सक डॉ. नेहा अनुज वर्मा, लिनेस क्लब वर्धाच्या माजी अध्यक्षा सौ. रीमा प्रशांत चौधरी, ग्रामपंचायत कोटंबाच्या सरपंच सौ. रेणुका रवींद्र कोटबकर व  स्वयंसिध्दा महिला असोसिएशनच्या अध्यक्षा सौ. वैशाली स्वप्निल बालपांडे यांनी समाजात केलेल्या उल्लेखनीय कामगिरीबद्दल यांना प.पु.स्वामी सत्यभक्त यांच्या स्मृती प्रित्यर्थ "सत्यभक्त गुण गौरव" महिला पुरस्कार देऊन सन्मानित करण्यात आले.

    

कार्यक्रमाचे प्रास्ताविक प्रीती सत्याम, संचालन सौ. कल्याणी भोंगाडे तर आभार सौ. शितल शर्मा यानी मानले. तसेच कार्यक्रमात लॉयन्स क्लबचे लॉयन्स गिरीश उपाध्याय, मोहन मोहिते, प्रवीण जैन, सुमित मुनोत, पंकज सराफ, विपिन पांडे, एम के सिंग, किशोर फाले, विवेक टिबडेवाल, पुरुषोत्तम सोनाये, तर स्पोर्ट कराटे असोसिएशनचे संचालक प्रकाश खंडार,श्याम पाटवा, सभासद निखिल सातपुते, प्रवीण पेठे,हरीश पाटील, शेखर भागवतकर, सुनील चंदनखेडे, सुशांत जीवतोडे उपस्थित होते.

      

कार्यक्रमाच्या यशस्वीतेकरीता संदीप जोशी, नम्रता चंदनखेडे, नीलम रंगारी, रूपाली खरकोड,मीनाक्षी निर्वाण, शबाना शेख, अश्विनी गुरनुले,भावना फतिंग, शुभांगी राऊत, शोभा कुकडे, इंद्रपाल जोगे यांनी अथक परिश्रम घेतले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !