गंगाबाई तलमले महाविद्यालय ब्रम्हपुरी येथे मोठ्या उत्साहात निरोप समारंभ संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : निरोप हा आपल्या सर्वांच्या जीवनाचा एक अविभाज्य भाग बनला आहे. आपण विद्यार्थी म्हणून वर्गात, शाळेत असताना, पुढे कॉलेजमध्ये गेल्यावर, कंपनीत अथवा शासकीय कार्यालयात कामकाज करताना, आपल्या जिवलग मित्र,मैत्रिणी,सहकारी यांच्यापासून आपल्याला काही ना काही निमित्ताने दूर जावे लागते.
हा क्षण आपण निरोप समारंभ म्हणून साजरा करतो.खरं तर प्रत्येकाच्या जीवनातला हा हळवा क्षण असतो.आजही तसाच आहे. आजच्या या निरोपाच्या क्षणी एका डोळ्यात आसू आणि दुसऱ्या डोळ्यात हसू आहे.असे (विद्यार्थी प्रतिनिधी) गणेश शेंडे याने सुत्रसंचालनामध्ये सांगितले.
यावेळी कार्यक्रमाचे अध्यक्ष रयत बहुउद्देशीय शिक्षण संस्था ब्रम्हपुरीचे उपाध्यक्ष प्रा.तुळशीरामजी तलमले, संस्थेचे सचिव,शरदजी तलमले,महाविद्यालयाचे प्राचार्य प्रा.लालाजी मैंद, प्रा. सुप्रिया तलमले, प्रा. तृप्ती नागदेवते, प्रा. सुरज तलमले, प्रा. अंकुश ठाकरे, तसेच महाविद्यालयातील सर्व विद्यार्थी, प्राध्यापक तथा प्राध्यापिका व शिक्षकेत्तर कर्मचारी उपस्थित होते.
महाविद्यालयातील विद्यार्थ्यांनी आपले मनोगत व्यक्त केले. व मान्यवरांनी विद्यार्थ्यांच्या पुढील शिक्षणाच्या वाटचालीस शुभेच्छा दिल्या. सोबतच महाविद्यालयामध्ये झालेल्या विविध स्पर्धांचे बक्षीस वितरण व सर्टिफिकेट देऊन विद्यार्थ्यांचा गुणगौरव करण्यात आला.
कार्यक्रम आयोजित करण्यासाठी विद्यार्थ्यांनी भरखोश प्रतिसाद दिला.कार्यक्रमाचे सूत्रसंचालन गणेश शेंडे (विद्यार्थी प्रतिनिधी) याने केले.तर कार्यक्रमाचे आभार प्रदर्शन आचल सेलोटे हिने मानले.