दिल्ली आदिवासी महिलांचे राष्ट्रीय अधिवेशनात गडचिरोली चे कुसुमताई अलाम यांचा सहभाग.

दिल्ली आदिवासी महिलांचे राष्ट्रीय अधिवेशनात गडचिरोली चे कुसुमताई अलाम यांचा सहभाग.


एस.के.24 तास


गडचिरोली : दिल्ली येथील constitution club मध्ये एक दिवसीय  आदिवासी महिलांचे राष्ट्रीय अधिवेशन झाले.देशात प्रथमच अशा प्रकारे संघर्ष करणाऱ्या महिला एकत्र येऊन आदिवासी विकासाचा पर्याय सरकारला उपलब्ध करून देण्याचा निर्णय घेतला आहे.गडचिरोली येथुन कुसुमताई अलाम यांनी या कार्यक्रमाचे माध्यमातून सरकारकडे आदिवासी महिलांचे आरोग्य आर्थिक राजकीय सामाजिक शैक्षणिक स्थिती चे अध्ययन व्हावे, केंद्र व राज्य महिला आयोगात सदस्यत्व मिळावे.


ग्रामपंचायत स्तरावर महिला संरक्षण कक्ष स्थापन करावे,वन आधारित रोजगार कायदा,आदिवासी बजेट मध्ये स्वतंत्र महिला बजेट ची मागणी केली आहे.या कार्यक्रमाला प्रामुख्याने सुप्रसिद्ध सामाजिक कार्यकर्ता साईदा सय्यदन हमीद, दिल्ली,निशा सिध्दू राजस्थान,ममता कुजुर,राजिम छत्तीसगड,विजय प्रताप,डॉ कंवलजित ढिल्लो, रमा खलखो,डॉ.वासवी किडो,आलोका कुजूर डॉ नितिशा खलखो झारखंड,डॉ ग्रेस,ज्यो,जारझोकम मणिपूर,साधना मिना


डॉ.हिरा मीना तथा  एकुण सतरा राज्यातील महिला कार्यकर्त्यांनी महिला अधिकार, कस्टमरी लाॅ, वनसंवर्धन नियम,जल जंगल जमीन, महिला हिंसाचार,संस्कृती,प्रथा,भाषा, समाज यावर आपापले मत व्यक्त केले.कार्यक्माची सुरुवात पुर्वजांच्या आशिर्वादाला आवाहन करून पारंपरिक पद्धतीने धान्याची पुजा करुन झाली.नॅशनल महिला फेडरेशन,नागा वुमेन्स असोशिएशन,आदिवासी महिला महासभा छत्तीसगड यांचे सहकार्य लाभले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !