सातत्यपूर्ण परिश्रम' तुमच्यातील न्यूनगंड नाहीसा करतो. - डिसेंबरजी दिवटे
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रम्हपुरी : " ध्येय निश्चितीनंतर त्यामध्ये स्वतःला झोकून देऊन,आपल्या ध्येयाप्रति समर्पणाची भावना तुमच्या आंतरमनात तयार झाली तर यश तुमचंच आहे" असे उद्गार मा.डिसेंबरजी दिवटे यांनी आपला सत्कार स्वीकारताना केले.
नुकतीच जिल्हा परिषद चंद्रपूर येथे त्याची शिक्षक या पदावर नियुक्ती झाली.त्यानिमित्ताने ब्रम्हपुरी येथील इंस्पायर करियर अकॅडमी तर्फे त्यांचा सत्कार करण्यात आला.' ही अकॅडमी,तुमचे सगळे प्राध्यापक तुमच्या आयुष्यात श्रीकृष्ण बनून आले आहेत,ज्याप्रमाणे कृरुक्षेत्रात अर्जुनाने श्रीकृष्णच्या मार्गदर्शनात यश मिळवलं त्याच प्रमाणे तुम्ही सुध्दा तुमच्या प्राध्यापक वर्गावर श्रध्दा ठेवा,गुरुवरील श्रध्दा हीच यश खेचून आणण्याची पहिली पायरी असल्याचं सुद्धा त्यांनी विद्यार्थ्यांना सांगितलं.
कार्यक्रमाला अध्यक्ष,म्हणून मा.प्रा.प्रवीण राऊत सर, प्रमुख पाहुण्या मा.प्रा.काजल ठाकूर मॅडम,विवेक खरवडे सर उपस्थित होते.तर पाहुण्यांचे आभार कु.सपना डोनाडकर हिने मानले. कार्यक्रमाला परिसरातील बऱ्याच विद्यार्थ्यांची उपस्थिती होती.