विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे विहिरगाव येथे आर्थिक मदत.

विजयभाऊ वडेट्टीवार यांच्यातर्फे विहिरगाव येथे आर्थिक मदत.


एस.के.24 तास


सावली : दिनांक,२३फेब्रुवारी २०२४ तालुक्यातील मौजा.विहिरगाव येथे जनसेवा हिच ईश्वर सेवा या अंगीकरलेल्या व्रताचे जतन करीत राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.श्री.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या विजयकिरण फाउंडेशनतर्फे  कॅन्सरग्रस्त रुग्न सौ.मनुका पांडू मेश्राम या महिलेस आर्थिक मदत देण्यात आली.


मौजा.विहिरगाव गावातील कॅन्सरग्रस्त रुग्ण महिला सौ.मनुका पांडू मेश्राम वय ५३ वर्षे हे घरातील कर्तबगार कुटुंब प्रमुख महिला आहेत, पती पांडू मेश्राम यांच्या सोबत मिळेल ते काम करून कुटुंबाचा उदरनिर्वाह करीत आहेत, पंरतू  बऱ्याच दिवसापासून तबेत बरी असल्यामुळं प्राथमिक उपचार करीत होत्या परंतु वारंवार त्यांना अस्वस्थ जाणवत होते.


उपचारदरम्यान त्यांना कॅन्सर असल्याचे डॉक्टरांनी स्पष्ट केले घरातील परिस्थिती अत्यंत बिकट असल्याने पूढील उपचार आर्थिक मदत हवी असल्याची माहिती सावली तालूका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीनजी गोहने यांना मिळाली तात्काळ त्यांनी राज्याचे विरोधी पक्षनेते व सावली- ब्रम्हपुरी विधानसभा क्षेत्राचे आमदार मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्याशी संपर्क साधून आर्थिक मदत मिळवून दिली.


सदर आर्थिक मदत देताना विहिरगाव ग्राम काँग्रेस कमिटीचे पदाधिकारी मा.दिलीप फुलबांधे,मा.कुसुमाकर वाकडे,मा.काशिनाथ मोटघरे,मा.अनिल भरडकर,मा.शरद धारणे आदी मान्यवर उपस्थित होते.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !