ने.हि.कर्मचारी सहायता निधीतून विद्यार्थ्याला आर्थिक सहाय्य.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,२८/०३/२०२४ येथील नेवजाबाई हितकारिणी महाविद्यालयातील कर्मचारी सहायता निधीतून वर्ग १२ वी वाणिज्य शाखेच्या सारंग दिगांबर मेश्राम या विद्यार्थ्याला दहा हजार रुपये आर्थिक निधी प्राचार्य डॉ डी एच गहाणेंच्या हस्ते प्रदान करण्यात आले.सदर विद्यार्थ्याचा अपघात झाला होता.त्याच्या रुग्नालयातील खर्चासाठी धनादेशाच्या स्वरुपात त्याचे वडील दिगांबर मेश्राम यांच्याकडे हा निधी सुपूर्द करण्यात आला.
यावेळी समितीचे डॉ योगेश ठावरी,डॉ धनराज खानोरकर,डॉ मोहन कापगते,डॉ.किशोर नाकतोडे, प्रा.निलिमा रंगारी,प्रा सुशिल बोरकर,अलोक मेश्राम इ.मान्यवर उपस्थित होते.दहा हजाराची आर्थिक मदत दिल्याबद्दल सारंग दिगांबर मेश्रामांनी कर्मचारी वर्गांचे आभार मानले.