सिंदेवाही येथे शेतकरी प्रशिक्षणाचे आयोजन.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : २०/०३/२०२४ कृषी तंत्रज्ञान व्यवस्थापन यंत्रणा आत्मा डाॅ. पंजाबराव देशमुख जैविक शेती मिशन अंतर्गत कृषी विज्ञान केंद्र, सिंदेवाही येथे ब्रम्हपुरी व सावली तालुक्यातील गटातील शेतकरी यांचे दिनांक १८ ते १९मार्च २४ या कालावधीत दोन दिवसाचे शेतकरी प्रशिक्षण आयोजित करण्यात आले.
प्रशिक्षण कार्यक्रमात अध्यक्ष म्हणून डाॅ. विनोद नागदेवते कार्यक्रम समन्वयक केव्हीके सिंदेवाही,डाॅ. सोनाली लोखंडे शास्त्रज्ञ, डॉ वेलादी शास्त्रज्ञ, डॉ. सिडाम शास्त्रज्ञ, पराग शहारे, बोरकुटे प्रगतशील शेतकरी सावली आदी उपस्थीत होते.
या प्रशिक्षण कार्यक्रमात बोलताना डॉ. नगदेवते यांनी सेंद्रीय शेतीचे महत्त्व समजावून सांगताना सेंद्रीय शेती पद्धत, विविध निविष्ठा निर्मिती,प्रमाणिकरण पद्धत, कंपनी स्थापित करणे आदीबाबत इतर पाहुण्यांनी मार्गदर्शन केले. कार्यक्रमा च्या यशस्वीतेसाठी तालुका तंत्रज्ञान व्यवस्थापक कावळे, सहाय्यक तंत्रज्ञान व्यवस्थापक हातझाडे, तुषार मेश्राम तंत्र सहाय्यक, सावली, चेतन खोब्रागडे तंत्र सहाय्यक ब्रम्हपुरी यांच्यासह अनेकांनी मोलाचे सहकार्य केले.