जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, अ-हेरनवरगाव येथे कॉन्व्हेंट च्या बाल वर्गाचे उद्घाटन संपन्न.
अमरदीप लोखंडे - सहसंपादक
ब्रह्मपुरी : दिनांक,११ /०३/२४ ब्रह्मपुरी तालुक्यातील अ-हेर नवरगाव जिल्हा परिषद प्राथमिक शाळेचे हरहुन्नरी मुख्याध्यापक तथा क्रियाशील,नवनवीन प्रयोग राबविणारे शिक्षक, शिक्षिका यांच्या नवकल्पनेतून जिल्हा परिषद प्राथमिक शाळा येथे कॉन्व्हेंट च्या बाल वर्गाचे उद्घाटन आज सकाळी ९ -००वाजता करण्यात आले.सदर बाल कॉन्व्हेंट वर्ग खोलीचे उद्घाटन शाळा व्यवस्थापन समिती अध्यक्ष श्री.किरण मिसार यांनी सौ.पुनमताई सतीश ठेंगरे,श्री. गोवर्धन बागडे माजी सरपंच कन्हाळगाव यांच्या प्रमुख उपस्थितीत पार पाडले.
यावेळी विद्यालयाचे मुख्याध्यापक देवानंद तुलकाने, शिक्षक एस.व्ही.खरकाटे सर,श्री एम. जी. पाथोडे सर , श्री एस. वाय. मून सर शिक्षिका नीता गजघाटे,प्रियंका निकुरे, रवीना कुथे, वैष्णवी नागरे, विनिता सोनवाणे व विद्यार्थी विद्यार्थिनी उपस्थित होते.