उपजिल्हा रुग्णालय ब्रम्हपुरी येथे जागतिक क्षयरोग दिनाचा कार्यक्रम.
अमरदीप लोखंडे सहसंपादक
ब्रम्हपुरी : उपजिल्हा रुग्णालय ब्रम्हपुरी येथे आज जागतिक क्षयरोग दिनाचा कार्यक्रम वैद्यकीय अधीक्षक डॉ निखिल डोकरीमारे यांचे प्रमुख उपस्थितीत घेण्यात आला.रॉबर्ट कॉक यांच्या प्रतिमेचे पूजन करून,क्षयरोग मुक्त भारत या केंद्र सरकार च्या महत्वाकांक्षी धोरणानुसार २०२५ पर्यंत संपूर्ण भारत क्षयरोग मुक्त करण्यासाठी, सार्वजनिक आरोग्य सेवांसोबत स्थानिक स्वराज्य संस्थांचे सहकार्य ,योगदान,तळागाळापर्यंत जनजागृती,शासनातर्फे पुरविण्यात येणाऱ्या सर्व निशुल्क आरोग्य सोयीसुविधाचा क्षयरुग्णांना लाभ, निक्षय पोषण योजने अंतर्गत आर्थिक मदत, समाजातील दानशूर व्यक्ती,संस्था,निक्षय मित्र यांचेकडून रुग्णांना सकस आहाराचा लाभ, क्षयरोग प्रतिबंधात्मक उपचार इत्यादी अनेक विषयांवर वर डॉ डोकरीमारे यांनी उपस्थितांना मार्गदर्शन केले.डॉ.श्रीकांत कामडी यांनीही आपले मनोगत व्यक्त केले.
रुग्णालयातील डॉ किशोर जीवने, डॉ.पुरुषोत्तम पटले,डॉ श्रीकांत नागमोती,डॉ समीर नाकाडे, डॉ अब्दुल शेख, डॉ सुप्रिया नाकाडे, डॉ ज्योती खरकाटे,डॉ सचिन मेंढे,डॉ नितीन सिडाम,डॉ रमणे,मॅट्रॉन वंदना शेंडे, आणि सर्व आरोग्य कर्मचारी व अनेक रुग्ण यावेळी उपस्थित होते.