ब्रेकिंग न्युज... चामोर्शी तालुक्यातील नवरगाव (कुणघाडा) च्या संविधान फलकाला जातीयवाद्यांनी काळे फासले.

 

ब्रेकिंग न्युज...


चामोर्शी तालुक्यातील नवरगाव (कुणघाडा) च्या संविधान फलकाला जातीयवाद्यांनी काळे फासले. 


एस.के.24 तास


चामोर्शी : चामोर्शी तालुक्यातील नवरगांव (कुणघाडा) येथील डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौकातील संविधान चौकाच्या नामफलकाला काही जातीयवादी लोकांनी हिरव्या रंगाचा पेन्ट लावून काळे फासण्याचा प्रकार आज दि.12 फेब्रुवारी पहाटेला उघडकीस आला. 

सदर प्रकरणाची माहिती डायमंड वाकडे,प्रमोद गोवर्धन व इतर बौद्ध बाधवांनी पोटेगांव पोलीस स्टेशनला माहिती दिली.संविधान चौकाच्या आजुबाजुला तिन कॅमेरे बसविले आहेत.पोलीसांनी फुटेज तपासनार तर संविधान फलकाला रंग फासणारे जातीयवादी सापडतील जर कॅमेरे बंद करून ठेवले असतील तर यांची सर्वश्री जबाबदारी ग्रामपंचायत पदाधिकाऱ्यावर राहणार आहे. 


अश्या प्रकारची चौकशी पोलीसांनी करावी  प्रकारची तक्रार बौद्ध बांधवांनी पोलीस स्टेशन पोटेगांव येथे देण्यात आलेली आहे.मागील एका वर्षा पासून नवरगांव झेंडा व फलकाचा वाद सुरु आहे.झेंडा व डॉ.बाबासाहेब आंबेडकर चौक नावाचे नामफलक दोन्ही पार्टीच्या लोकांच्या साक्षीसे पोलीसा समक्ष उपडून टाकण्यात आले व जिल्हाधिकारी व जिल्हा पोलीस अधिक्षक गडचिरोली यांच्या साक्षीसे दोन्ही पार्टीच्या लोकांच्या समस्य संविधान चौक नावाने नामफलक रितसर लावण्यात आले होते.


दिड महिण्याचा कालावधी जात नाही तोच आज पहाटे काही जातीयवादी लोकांनी अंधाराचा फायदा घेऊन फलकाला काळे फासण्याचा प्रकार उघडकीस आला.


सदर प्रकरणाची योग्य चौकशी करून दोषीवर कडक कारवाई करावी अन्यता रिपब्लिकन पार्टी तर्फे तिव्र आंदोलन छेडण्याचा ईशारा रिपाईचे जिल्हाध्यक्ष, गोपाल रायपूरे,रिपाईचे गडचिरोली जिल्हाध्यक्ष प्रा. मुनिश्वर बोरकर,कविश्वर झाडे,डायमंड वाकडे प्रमोद गोवर्धन आदिनी दिलेला आहे.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !