चिचडोह प्रकल्पाला जोडणाऱ्या रस्त्याचे भूमिपूजन संपन्न.
★ जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत ७० लक्ष रुपयांचा बांधकामासाठी निधी प्राप्त.
एस.के.24 तास
सावली : दिनांक :- १६ मार्च २०२४ चंद्रपूर आणी गडचिरोली जिल्हाला जोडणारा महत्वाचा दुवा म्हणजे चिचडोह प्रकल्प,याला जोडणाऱ्या रस्त्याचे मजबूतीकरण व बांधकाम करिता विकास कामाचे भूमिपूजन आज करण्यात आले राज्याचे विरोधी पक्षनेते मा.ना.विजयभाऊ वडेट्टीवार यांच्या जिल्हा खनिज प्रतिष्ठान अंतर्गत ७० लक्ष रुपयांचा बांधकामासाठी निधी प्राप्त झाला त्याचे भूमिपूजन सोहळा ग्रामपंचायत कार्यालय लोंढोलीचे सरपंच मा.उष्टू पेंदोर व उपसरपंच मा.प्रमोद खोबे यांच्या शुभहस्ते पार पडला.
यावेळी माजी सभापती पंचायत समिती सावली मा.राकेश पाटील गड्डमवार,तसेच मा.शंकरराव बोदलकर,मा.मनोज खोबे,मा.दिलीप लटारे,मा.राजु बोदलकर,मा.पुरुषोत्तम बोदलकर,मा.परिमल भटकर,मा.बळीराम खोबे,मा.तुकाराम भुरसे,मा.बाबाजि कुकडे,मा.मोरेश्वर भुरसे आदी उपस्थित होते.