महाराजस्व अभियानांतर्गत दाखल्यांचे वितरण.
एस.के.24 तास
मुल : महाराजस्व अभियानांतर्गत मुल तालुक्यातील ताडळा तुकुम,जुनासूर्ला,भेजगाव,गोलाभुज,व सुशी दाबगाव या गावात महसूल प्रशासनातर्फे भटक्या विमुक्त जाती,जमाती व आदिवासी समुदायातील व्यक्तींना दाखला प्रदान करण्यासाठी शिबिराचे आयोजन करण्यात आले आहे.तहसिलदार मृदुला मोरे यांनी दिलेल्या सूचनेनुसार येथे 4ते 5 मार्च रोजी महाराजस्व अभियानाअंतर्गत भटके व विमुक्त जमातीतील लाभाथ्र्यांना दाखले देण्यात आले.
यावेळी महसूल विभागांतर्गत विविध दाखले,आधारकार्ड दुरूस्ती,रेशन कार्ड विषयक कामे ,संजय गांधी ,श्रावणबाळ योजनेतअंतर्गत,निवणूक मतदार जागृती व नोंदणीचे प्रमाणपत्र वितरित करण्यात आले.ग्रामपंचायत ताडाळा तुकूम,जुनासूर्ला,भेजगाव,सुशी दाबगाव व गोलाभूज सरपंच ,पोलीस पाटील व गावातील प्रतिष्ठाीत व्यक्ती,विद्यार्थी यांनी शिबिराच्या आयोजनासाठी सहकार्य केले.
यावेळी नंदकिशोर कुमरे,नायब तहसिलदार मूल,नन्नावरे मंडळ अधिकारी,मूल,वडस्कर तलाठी,ताडाळा तुकूम, गोहणे मंउळ अधिकारी,बेंबाळ,मेश्राम तलाठी भेजगाव, मेश्राम ,मंडळ अधिकारी राजगड,गडेकर तलाठी जुनासूर्ला,श्री विजय पंडिले नायब तहसिलदार मूल,कानकाटे मंडळ अधिकारी चिखली, श्री पिदुरकर तलाठी राजोली, उरकुडे,मंडळ अधिकारी,चिरोली ,बगडे तलाठी सुशी दाबगाव,अश्वीनी गजबिये,सेतू लिपीक,तहसिल कार्यालय,मूल, गजू रायपूरे,सेतू आॅपरेटर,रामटेके राशन कार्ड लिपीक,मशाखेत्री महाआॅनलाईन प्रगती सेतू सुविधा केंन्द्र मूल ,विवेक मुनगलवार आॅपरेटर, आयोजिती शिबारास उपस्ज्ञित होते.