वृद्धाश्रमातील महिलांना मदत करून साजरा केला नंदकिशोर वाढई यांनी वाढदिवस.
राजेंद्र वाढई - उपसंपादक
राजुरा : कळमनाचे उपक्रमशील स्मार्ट सरपंच, ओबीसी काँग्रेसचे प्रदेश सचिव, अ. भा. सरपंच परिषदेचे चंद्रपूर जिल्हाध्यक्ष नंदकिशोर वाढई यांनी आपला वाढदिवस महात्मा ज्योतिबा फुले अनाथ वृद्धाश्रम चिंचोली खु येथे अनाथ वृद्ध महिलांना साडी, चोळी व खाद्य पदार्थ वाटप करून वाढदिवस उत्साहात साजरा केला. आपले पंजोबा समाजसेवक नागोबा पाटील वाढई यांच्या पासून प्रेरणा घेऊन अन्न वस्त्र निवारा या तीन मूलभूत गरजा भागविण्यासाठी दिनदलित शोषीत पिडीत घटकांसाठी त्यांनी जसे काम केले. त्याचप्रमाणे समाजसेवेचे व्रत पुढे नेण्याचा प्रयत्न नंदकिशोर वाढई हे करीत असून गोरगरीबांची सेवा करीत गाव स्वच्छ, सुंदर, हिरवगार करण्याचा प्रयत्न ते सातत्याने करीत आहेत.
गावात विविध उपक्रम राबवून ते गाव विकासासाठी धडपडत असतात. त्यामुळेच आपला वाढदिवस अनाथ वृद्ध माता भगीनींसोबत साजरा करण्याचे ठरवून वाढदिवसी बडेजाव करण्यात येणारा खर्च त्यांनी वृद्धाश्रमातील माताभगीनींना साडी, चोळी, फळे, खाद्य पदार्थ देऊन अल्पशी मदत करण्यासाठी खर्च केली. अशाच पद्धतीने आजिवन गोरगरीब, ग्रामवाशीयांच्या सेवेत राहून जीवन धन्य करण्याचा संकल्प त्यांनी जाहीर केला.
या प्रसंगी विमाशीचे जिल्हाध्यक्ष केशवराव ठाकरे यांनी मार्गदर्शन करताना सांगितले की सरपंच नंदकिशोर वाढई सर्व गुण संपन्न, व्यसनमुक्त, सर्वांशी संवाद ठेऊन गावासाठी सर्वांगीण विकास करणारा माणूस आहे. आपल्या पंजोबांच्या सेवाभावी वृत्तीने प्रेरित होऊन ते गोरगरीबांसाठी, गावासाठी काम करीत आहेत. अनेक महत्त्वाची विकासकामे त्यांनी पुर्ण केली आहेत. येणाऱ्या काळात प्रत्येक अडथळे दूर करीत ते यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही असा विश्वास व्यक्त केला.
या प्रसंगी सेवानिवृत्त विस्तार अधिकारी तथा भोई भनारी समाजाचे अध्यक्ष कृष्णाजी भोयर, आदिवासी नेते तथा पंचायत राज अभ्यासक बापुराव मडावी, पोलीस पाटील बाळकृष्ण पिंगे, तमुस अध्यक्ष निलेश वाढई, उपसरपंच कौशल्या कावळे, ग्रामसेवक मरापे, महादेव ताजणे, धोपटाळा चे माजी सरपंच राजु पिंपळशेंडे, जेष्ठ नागरिक पुरुषोत्तम काळे, नामदेव पाटील अहिरकर, माजी सरपंच अर्जुन पायपरे, गुरुदेव सेवा मंडळाचे दत्ताजी पिंपळशेंडे, नामदेव लोनगाडगे, लटारी भगत, बबनराव भगत, लक्ष्मण ढोबे, सुरेश ताजणे, तुकाराम बांदुरकर, प्रकाश आत्राम, पुंडलिक काळे, शंकर काळे, प्रभाकर अहिरकर, महादेव वैद्य, सुरेश गौरकार, विठ्ठल पाटील वाढई, श्रावण गेडाम, सुनील मेश्राम, वृद्धाश्रमातील अनाथ वृद्ध महिला, वसतीगृहातील विद्यार्थी, शिक्षक, यासह गावकरी मोठ्या संख्येने उपस्थित होते.