शा.औ.प्र.संस्थेत जागतिक महिला दिन संपन्न.
एस.के.24 तास
गडचिरोली : शासकीय औद्योगिक प्रशिक्षण संस्था गडचिरोली येथील राष्ट्रीय सेवा योजना विभागाच्या वतीने जागतिक महिला दिनाचे आयोजन करण्यात आले होते. अध्यक्षस्थानी प्रभारी गटनिदेशिका,सौ.मिना गांगरेड्डीवार होत्या. प्रास्ताविक सुजाता मेश्राम यांनी केले.
यावेळी रासेयोचे कार्यक्रम अधिकारी संतोष बोंद्रे , प्रविणा मानकर,लता बुरबांदे,कल्याणी नानोरकर, शितल सहारे आदींनी समयोचित विचार व्यक्त केले.
सूत्रसंचालन ममता मल्लेलवार तर आभार प्रदर्शन हिमेश्वरी कवाडकर यांनी केले. सदर कार्यक्रमाचे आयोजन नवीन वर्कशॉपमध्ये करण्यात आले तसेच संगीत खुर्ची स्पर्धेत महिलांनी उत्स्फूर्त सहभाग नोंदविला.
कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी प्रशिक्षणार्थी ओंकार मोरांडे ,गौरव खोब्रागडे, धनंजय काटोले यांनी परिश्रम घेतले.