धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य पुरस्काराने चुडाराम बल्हारपुरे पुरस्कृत.
★ "गोंडवानाचा महायोध्दा : क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकास पुरस्कार.
एस.के.24 तास
गडचिरोली : ऍग्रोन्युज परिवार चॅरिटेबल ट्रस्ट, फलटण (जिल्हा सातारा) या संस्थेतर्फे 'धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज उत्कृष्ट वांड्.मय स्पर्धा' आयोजित करुन विजेत्या साहित्यिकांना साहित्य प्रेरणा पुरस्काराने सन्मानित करण्यात येते.अत्यंत प्रतिष्ठेचा समजला जाणाऱ्या या राज्यस्तरीय पुरस्काराकरीता यावेळी राज्यभरातील एकूण ३८ साहित्यिकांच्या दर्जेदार साहित्याची निवड करण्यात आली.
मराठी भाषा गौरव दिनाचे निमित्ताने फलटण (जिल्हा सातारा) येथे आयोजित साहित्य संमेलनाचे उद्घाटक परमपूज्य तपोनिधी शिवयोगी नंदगिरी महाराज यांच्या हस्ते व इतिहास अभ्यासक, व 'शंभुराजे' या महानाट्याचे लेखक प्रा. नितीन बानगुडे, कोकणातील ज्येष्ठ साहित्यिक जगन्नाथ शिंदे, संमेलनाचे अध्यक्ष युवा कवी अविनाश चव्हाण, ग्रामीण कथाकार रवींद्र कोकरे, ट्रस्टचे अध्यक्ष प्रकाश सस्ते, संयोजक प्रा. विजय काकडे इ. मान्यवरांच्या हस्ते या वर्षातील दर्जेदार साहित्यकृतींना सन्मानित करण्यात आले. त्यात झाडीपट्टीतील नाटककार चुडाराम बल्हारपुरे यांनाही त्यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकाचे लेखनासाठी "धर्मवीर छत्रपती संभाजी महाराज साहित्य प्रेरणा " पुरस्काराने सपत्नीक गौरविण्यात आले.
कार्यक्रमाचे सुत्रसंचलन संजय गार्डे व सुलभा हस्ते यांनी केले.चुडाराम बल्हारपुरे यांच्या "गोंडवानाचा महायोध्दा- क्रांतिवीर बाबूराव शेडमाके" या नाटकाला यापूर्वी कंथेवाडी (जिल्हा कोल्हापूर) येथील साहित्य संमेलनात साहित्य प्रेरणा पुरस्काराने गौरविण्यात आले आहे.
चुडाराम बल्हारपुरे यांच्या या यशाबद्दल प्रा. अरुण बुरे, योगेश गोहणे, डॉ . प्रा. श्याम मोहरकर, डॉ.प्रा. जनबंधू मेश्राम, डॉ.प्रा. योगीराज नगराळे, डॉ. प्रा. राजकुमार मुसणे, दै. लोकमतचे संजय तिपाले, दै. हितवादचे रोहिदास राऊत, दै. देशोन्नतीचे नरेश बावणे, दै. सकाळचे मिलिंद उमरे, दै. पुण्यनगरीचे प्रल्हाद म्हशाखेत्री व प्रमोद गेडेकर, प्रा. नवनीत देशमुख (साहित्यिक), मधुश्री प्रकाशनचे पराग लोणकर (प्रकाशक) , आदिवासी साहित्यिक प्रा. प्रब्रम्हानंद मडावी, व नंदकिशोर नैताम, पुंडलिक भांडेकर (पत्रकार) व इतर साहित्यिक मित्रांनी अभिनंदन केले आहे.