अवकाळी पाऊस व गारपिठीमुळे शेतपिकाचे नुकसान झालेल्यांना भरपाई घ्या. - विलास दशमुखे
एस.के.24 तास
गडचिरोली- गडचिरोली तालुक्यात २० मार्च च्या अकस्मित पाऊस व गारपिठाने तालुक्यातील शेतकऱ्यांच्या पिकाचे अथोनाथ नुकसान झाले.अश्या शेतकऱ्यांना शासनाने नुकसान भरपाई घ्यावी अशी मागणी माजी उप सभापती विलास दशमुखे प.स.गडचिरोली यांनी प्रशासनाला एका निवेदनाद्वारे केली.
गडचिरोली तालुक्यातील वसा.पोर्ला,काटली,नगरी, साखरा,जेप्रा,दिभना या गावांना अवकाळी पावसाचा, वादळवारा व गारपिठीचा तळाका बसला असुन यात धानपिक,भाजीपाला,मका मिरची पिकाचे अथोनाथ नुकसान झाले.
शेतकऱ्यांचा तोंडाचा घास हिरावल्या गेल्यामुळे शेतकरी आता शकंटात सापडला आहे.त्यामुळे शेतकऱ्यांना दिलासा देण्याकरीता त्यांना मदतीची गरज आहे.त्यामुळे शेतातील पंचनामे तात्काळ करून तशा अहवाल शासनाकडे पाठवावा व शेतकऱ्यांना आर्थिक मदत करावी अशी मागणी प.स.चे माजी उपसभापती विलास दहामुखे यांनी प्रशासन व शासनाला निवेदनातून केलेली आहे.