चिमुर - गडचिरोली लोक सभेची उमेदवारी अखेर भाजपने अशोक नेते यांनाच दिली सर्वत्र जल्लोष.
एस.के.24 तास
गडचिरोली : चिमुर - गडचिरोली लोकसभा निर्वाचन क्षेत्राची उमेदवारीबाबत भाजपा कि राष्ट्रवादी अश्या प्रकारचे रस्सीखेच सुरु असताना भाजपाच्या हायकमांडने अखेर योग्य विचार करून भाजपाचे माजी खासदार अशोक नेते यांनाच उमेदवारी दिल्या मुळे भाजपाच्या कार्यकार्यांनी मोठ्या जल्लोषात फटाकेबाजी करून सर्वत्र आनंद व्यक्त केला.
खासदार अशोक नेते हे चिमुर लोकसभा क्षेत्राचे गेल्या १० वर्षापासून नेतृत्व करीत आहेत. त्यांच्या सुस्वभावी,प्रेमळ , व्यक्ती त्वामुळे ते सदर क्षेत्रात लोकप्रिय खासदार म्हणून ओळख आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्यावर विश्वास ठेवून त्यांनी गडचिरोली जिल्हयाचा विकास केलेला आहे.
व पक्ष वाढीचे काम केलेले आहे.त्यामुळे भाजपने अशोक नेते यांना तिसऱ्यांदा संधी दिल्यामुळे अशोक नेते यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी,गृहमंत्री अमित शहा ' भाजप अध्यक्ष नड्डा ' उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस,प्रदेश अध्यक्ष चंद्रशेखर बावणकुडे यांचे आभार मानले आहे.