चिमुर लोकसभा निवडणुक महायुतीचा उमेदवार कोण अजुन गुलदस्त्यातच ?
एस.के.24 तास
गडचिरोली : चिमुर - गडचिरोली लोकसभा मतदार संघात महायुतीचा उमेदवार कोण असणार हे अजुनही गुलगदस्त्यातच ? असुन महायुतीत राष्ट्रवादी कांग्रेस असल्यामुळे चिमुर - गडचिरोली लोकसभेची जागा राष्ट्रवादी कांग्रेसलाच मिळावी हे राजे धर्मरावबाबा आत्राम पहिले पासूनच आग्रही भुमिका घेत आहेत.
गेल्या १० वर्षा पासून सदर जागेवर भाजपाचे वर्चस्व असुन विद्यमान खासदार,अशोक नेते संपुर्ण चिमुर लोकसभा क्षेत्रात गावा गावात फिरून सभा संम्मेलन बैठका घेत आहेत.परंतु भाजपा,राष्ट्रवादी आणि शिवसेना या महायुतीमुळे सदर जागेवर भाजपा व राष्ट्रवादी आपापले दावे प्रतिदावे करत आहेत.
त्यामुळे सदर जागा राष्ट्रवादी की भाजपा च्या वाटेला जाणार हे दिल्लीत पक्ष श्रेणीच मंगळावर पर्यंत ठरविणार त्यामुळे भाजपाच्या गोठात धागधुकी निर्माण झाली आहे. तर मविआ मध्ये डॉ.नामदेवराव किरसान यांनाच उमेदवारी मिळणार म्हणून ते बिनधास्त असुन महायुतीची जागा राष्ट्रवादी कांग्रेसलाच जावो अशी प्रार्थना करीत आहेत.
महायुतीमधे भाजपाकडे अशोक नेते व डॉ.मिलिंद नरोटे हे प्रबळ दावेदार आहेत तर राष्ट्रवादी कांग्रेसकडे राजे धर्मरावबाबा आत्राम हे प्रबंळ दावेदार मानल्या जात आहेत.कोण कुणाची तिकीट कापणार व कोणाला उमेदवारी मिळणार याकडे मतदारांचे सुद्धा लक्ष लागुन आहे.