संविधानाला वाचविण्यासाठी डॉ.किरसान यांना निवडुन द्या.
★ विजय आपल्या सोबत आहे.विजय आमचाच आहे. - विजयभाऊ वडेट्टिवार
मुनिश्वर बोरकर - गडचिरोली
गडचिरोली - लोकसभा निवडणुक २०२४ मधे परिवर्तन होणे काळाजी गरज आहे.आता जर परिवर्तन झाले नाही तर यापुढे निवडणुकाही होणार नाहीत. संविधानाला संपविण्यासाठी निघालेल्या लोकांना संपवायचे आहे.संविधानाला वाचवायचे आहे. लोकशाहीवर आमचा विश्वास आहे.
यासाठी डॉ. नामदेवराव किरसान यांना लोकसभेत पाठवायचे आहे.एवढ्या मोठ्या संख्येने आज आपण उपस्थित झालात गावागावात जावून सांगा की इंडिआ आघाडी शिवाय पर्याय नाही.अश्या प्रकारचे मार्गदर्शन विरोधी पक्षनेते विजयभाऊ वडेड्डिवार यांनी डॉ.नामदेव किरसान यांच्या उमेदवारी अर्ज भरण्याच्या पूर्वी वासेकर लॉन येथे इंडिया आघाडीची सभेत विजयभाऊ बोलत होते. कालपर्वा आमच्या सोबत बकरा खाणारे व्यक्ती आज इकडे तिकडे खुरमुंडी खायला गेलेत.
तिकडेही त्यांची खुरमुंडी शिजणार नाही. लोकसभेची तिकीट मलाच मिळणार असा गाजावाजा करणारे अहेरीचे राजे त्यांची आज काय परिस्थिती झाली. (कुणाचेही नाव न घेता ) अश्या आयाराम गयाराममुळे कांग्रेसचे कदापिही नुकसान होणार नाहीं. मतदार अश्या लोकांना धडा शिकविल्या शिवाय नाही. शिवसेना , राष्ट्रवादी आमच्या सोबत आहे.असे विजयभाऊ वडेट्टिवार भाजपावर बरसले.
तिन तिघाडा काम बिघाडा राज्याचे सरकार कुचकामी ठरले आहे. अश्या सरकारमुळे शेतकऱ्याचे भले होणार नाही. डॉ. किरसान पायाला भिंगरी बांधुन चिमुर लोकसभा क्षेत्र पिंजुन काढत आहे.दंडारी पासुन ते सभा सम्मेलन घेणारे डॉ.नामदेव किरसान यांना विदर्भात न ओळखणारा सापडणार नाही.अश्या लोकप्रिय कांग्रेसच्या उमेदवारांना लोकसभेत पाठवा यातन तुमचे भले आहे. असेही वडेट्टिवार म्हणाले.
याप्रसंगी उमेदवार डॉ.नामदेव किरसान ' आमदार कोरेते देवरी,अनिरुद्ध वणकर,शिवसेनेचे महेश केदारी यांचेही मार्गदर्शन लाभले.या प्रसंगी माजी आमदार मारोतराव कोवासे,माजी आमदार सतिश वारजुरकर,माजी आमदार पेटांरामा तलांडी,माजी आमदार आनंदराव गेडाम,ॲड.राम मेश्राम, डॉ.महेश कोपूलवार,जेसा मोटवाणी, भातकुलकर,श्याम धाईत,अजय ककंडालवार, हसनभाई गिलाणी,भेंडारकर,प्रकाश इटनकर,विश्वजित कोवासे,अरविंद कात्रटवार,माहुरकर मॅडम,कुसमनाई अलाम आदीची उपस्थिती लाभली होती.
कार्यक्रमाचे प्रास्ताविक कांग्रेसचे जिल्हाध्यक्ष,महेंद्र बाम्हणवाडे तर आभार माजी आमदार शतीश वारजुरकर यांनी केले. कार्यक्रमानंतर डॉ.नामदेवराव किरसान यांचा उमेदवारी अर्ज भरण्यात आला.कार्यक्रमास तुफान गर्दी होती.