हिरापूर येथे जागतिक महिला दिनानिमत्य विविध सांस्कृतिक व क्रिडास्पर्धांचे आयोजन. ★ ग्राम काँग्रेस कमिटी हिरापूर व राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांच्या संयुक्त उपक्रम.

हिरापूर येथे जागतिक महिला दिनानिमत्य विविध सांस्कृतिक व क्रिडास्पर्धांचे आयोजन.


★ ग्राम काँग्रेस कमिटी हिरापूर व राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांच्या संयुक्त उपक्रम.


एस.के.24 तास


सावली : दिनांक,०५ मार्च २०२४ एकोणिसाव्या शतकाच्या अखेरपर्यंत, स्त्रियांना दुय्यम दर्जाची वागणूक दिली जात असे. उपभोग व कष्ट याचे साधन म्हणजे स्त्री, असा समज सर्वसाधारणपणे रूढ होता. म्हणूनच, समाजात समानतेने वावरणे, संपत्तीवरील अधिकार, तसेच शिक्षण किंवा मतदान यासारख्या अधिकारांपासून स्त्रिया वंचित होत्या. मात्र, एकोणिसाव्या शतकाच्या मध्यानंतर, आपल्यावर होणारा अन्याय, आपले हक्क याबाबत स्त्रियांमधे सजगता येऊ लागली. त्यातूनच स्त्रीवादाचा जन्म झाला.स्वतःच्या हक्कासाठी दिलेल्या लढ्याच्या स्मरणार्थ दरवर्षी, 8 मार्च हा दिवस महिला दिन म्हणून साजरा करण्यात येतो.

त्या प्रित्यर्थ ग्राम काँग्रेस कमिटी हिरापूर व राजमाता जिजाऊ महिला मंडळ यांच्या संयुक्त माध्यमातून हिरापूर येथे जागतिक महिला दिनानिमत्य विविध सांस्कृतिक व क्रिडास्पर्धां यात महिलांची कबड्डी स्पर्धा,एकल नृत्य,समूह नृत्य,वक्तृत्व स्पर्धा आदीचे आयोजन करण्यात आले आहेत.


आज सदर कार्यक्रमाचे उदघाटन सोहळा पार पडले सावली तालुका काँग्रेस कमिटीच्या अध्यक्षा सौ.उषाताई भोयर, सहउदघाटक मोखाळा च्या सरपंच सौ.प्रणिता मशाखेत्री, अध्यक्षस्थानी हिरापुरच्या सरपंच सौ.प्रीती गोहने या उपस्थित होत्या.


या प्रसंगी सावली तालुका काँग्रेस कमिटीचे अध्यक्ष मा.नितीन गोहने,माजी सभापती प.स.मा.विजय कोरेवार,माजी सभापती मा.राजेंद्र भोयर,सरपंच संघटनेचे अध्यक्ष मा.पुरषोत्तम चुदरी,बोथलिचे उपसरपंच मा.विजय गड्डमवार,ग्राम काँग्रेस कमिटी लोंढोलीचे अध्यक्ष मा.दिलीप लटारे,उसेगावचे उपसरपंच मा.सुनील पाल,किसान राईसमिल व्याहाड बुजचे अध्यक्ष मा.सुनील बोमनवार,हिरापूरचे उपसरपंच मा.शरद कन्नाके,


ग्रामीण पत्रकार संघाचे अध्यक्ष मा.अनिल गुरुनुले,काँग्रेस कार्यकर्ता व्याहाड बुज मा.जयंत संगीडवार व मा.दिपक गदेवार,ग्राम काँग्रेस कमिटी सोनापूरचे अध्यक्ष मा.डोमा शेंडे, जि.प.शाळा हिरापूरच्या मुख्याधापिका कु. गीता मोहुर्ले,सदस्य ग्रा.प.हिरापूर सौ.निता मूनघाटे, गाव तंटामुक्ती अध्यक्ष मा.कालिदास मेश्राम,युवा काँग्रेस कार्यकर्ता मा.किशोर घोटेकर,जनसंपर्क कार्यालय प्रमुख मा.कमलेश गेडाम,मा.विनोद जम्पलवार, मा.नरेश आभारे,मा.रघुनाथ शेडमाके आदी उपस्थित होते.


कार्यक्रमाच्या उदघाटक सौ.उषाताई भोयर यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन करताना म्हणाल्या की,भारत देश हा थोर स्त्रियांचा ऐतिहासिक वारसा जपणारा देश आहे,स्त्रियांनी फक्त चुल आणी मूल याकरिता मर्यादित राहू नये, आधुनिक काळामध्ये स्त्रियांनी क्रांतिज्योती सावित्रीबाई फुले, राष्ट्रमाता जिजाऊ, माता रमाई यांचा वारसा जपत पुरुष्यांचा खांद्याला खांदा लावीत सर्वच क्षेत्रात भरीव कामगिरी करावी,तसेच जागतिक महिला दिनानिमित्त सर्वांना शुभेच्छा दिल्या.


कार्यक्रमाचे सूत्रसंचालन जि.प.शाळेचे शिक्षक मा.पाटेवार सर,प्रस्तावना शाळा व्यवस्थापन समितीचे अध्यक्ष मा.संदीप सायत्रावार तर आभार मा.केशरी मूनघाटे यांनी मानले.

#buttons=(Accept !) #days=(20)

Our website uses cookies to enhance your experience. sk24taas
Accept !