जेप्रा येथे जागतीक महिला दिन उत्साहात साजरा.
★ म.रा.ग्रा.जिवनोन्नती अभियान, ग्रामसंघ, स्वयंसहायता समूह तथा मॅजिक बस गडचिरोलीच्या वतीने आयोजित.
एस.के.24 तास
गडचिरोली : जेप्रा येथे जागतीक महिला दिनानिमित्त विविध कार्यक्रम घेऊन साजरा करण्यात आला. सदर कार्यक्रम म.रा.ग्रा.जिवनोन्नती अभियान तालुका अभियान कक्ष गडचिरोली, दिव्यज्योती व संजीवनी ग्रामसंघ, स्वयंसहायता समूह तथा मॅजिक बस गडचिरोली येथील जेप्रा, आंबेशिवणी व पोर्ला च्या वतीने आयोजीत करण्यात आला.
या कार्यक्रमाची सुरूवात महिलांचे आरोग्य शिबिर, उद्घाटन सोहळा, त्यानंतर महिलांचे विविध स्पर्धा आयोजित करण्यात आल्या आणि मॅजिक बस तर्फे विजेत्या स्पर्धकांना बक्षिस वितरण करण्यात आले .तर रात्री महिलांचे सांस्कृतिक कार्यक्रम आयोजित करण्यात आले.
या कार्यक्रमाला उद्घाटक म्हणून सौ.शशिकला झंजाळ सरपंच, सहउद्घाटक सौ. कुंदाताई लोनबले उपसरपंच,अध्यक्ष रूपाली बांगरे दि.म. ग्रामसंघ, उपाध्यक्ष सौ. मालताताई धुळसे सं.म.ग्रामसंघ,मार्गदर्शिका सौ.भारती शिवणकर मु.जि.प.शाळा दिभना, दिप प्रज्वलन सौ. लिना आलाम कृषिसहायक गडचिरोली, प्रमुख अतिथी प्रो. मिनाक्षी छौकट मॅडम कर्मवीर महाविद्यालय मुल
प्रा.सरिता बुटके फुले आंबेडकर कॉलेज ऑफ सोशल वर्क गडचिरोली,सौ. प्रतिभा गावतुरे,सौ शालुताई संदोकर,सौ गिता झंजाळ,सौ. छबुताई मेश्राम,सौ.छाया टेकाम तलाठी,वामन गडपायले, वासुदेव गावतुरे, लेखाराम हूलके, उपलेंचवार सर, मंडलवार सर,सौ. उषाताई गावतुरे,गुणाजी देशमुख,अनिल खोब्रागडे,देवाजी बावणे,जि.प.शाळा शिक्षकवृंद, आंगणवाडी सेविका, आशावर्कर तसेच या कार्यक्रमाला गावातील अनेक महिलांनी सहभाग दर्शविला.
या कार्यक्रमाच्या यशस्वीतेसाठी सौ.निता धुळसे,सौ.माधुरी चलाख,सौ.नंदा सलामे,सौ.मीना मेश्राम,सौ.नलिनी बावणे,गावातील सर्व गट व समूहातील सर्व महिलांनी अथक परिश्रम घेतले.
मॅजिक बस संस्थेचे वरिष्ठ जिल्हा कार्यक्रम अधिकारी मा. श्री. प्रशांत लोखंडे यांच्या मार्गदर्शनात व तालुका निरीक्षक आकाश गेडाम यांच्या नेतृत्वात मॅजिक बस इंडिया फाऊंडेशन गडचिरोली तालुक्यात ' जागतिक महिला दिवस' साजरा करण्यात आला.