धनगर समाज घरकुलांपासून वंचित. - मंत्री,सुधीर मुनगंटीवार यांना विचारणार जाब.
एस.के.24 तास
चंद्रपूर : महाराष्ट्र शासनाने भटक्या जमातीसाठी यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजने अंतर्गत हजारो घरकुल मंजूर झाले असतांना धनगर समाज वंचित असल्याने पालकमंत्री,सुधीर मुनगंटीवार यांचेवर नाराज आहे.त्यामुळे लोकसभा निवडणुकीत सुधीर मुनगंटीवार यांना मतांचा फटका बसण्याची शक्यता आहे.
अहिल्याबाई होळकर घरकुल योजना ही भटक्या जमाती क धनगर प्रवर्गासाठी आहे. मात्र जिल्ह्यात अजूनही या योजनेची आंमलाबजावणी करण्यात आलेली नाही. जिल्ह्यात यशवंतराव चव्हाण मुक्त वसाहत योजनेंतर्गत भटक्या जमतीला विद्यमान पालकमंत्री सुधीर मुनगंटीवार यांनी आपल्या बल्लारपूर विधानसभा क्षेत्रात भरपूर घरकुले मंजूर केली.
परंतु त्यांच्याच क्षेत्रात धनगर समाजाचे मतदार मोठ्या प्रमाणात असतांना यशवंतराव चव्हाण मुक्त घरकुल योजनेतून लाभ दिला तर नाही मात्र अहिल्याबाई होळकर घरकुल योजनाही मंजूर करण्यात आले नाही.
त्यामुळे जिल्ह्यातील धनगर समाज मुनगंटीवार यांचेवर नाराज असल्याचे दिसते. आता तर घरकुल मंजूर न करता लोकसभेचे उमेदवार मुनगंटीवार असल्याने धनगर समाजाकडे मत मागण्यासाठी जातांना कार्यकर्त्याना समाजाचे बोलणे ऐकावे लागणार आहे.याचा परिणाम मतावर होणार असल्याची चर्चा होत आहे.